टेलिव्हिजन विश्वातील ‘DID Li’l Masters’ आणि ‘झलक दिखला जा’ हे मोठे डान्स रियालिटी शो जिंकून चर्चेत आलेला फैजल खान आता अभिनेता झाला आहे. डान्सर असलेल्या फैजलला डान्स शो जिंकल्यानंतर अभिनयाच्या ऑफर आल्या आणि तो अभिनेता बनला. सध्या ‘धर्म योद्धा गरुड’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या फैजलला आजीवन बॅचलरच राहायचे आहे. २३ वर्षीय फैजलचा प्रेमावरून एवढ्या लवकर विश्वास उडाल्यामुळे त्याने आता सलमान खानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कायम बॅचलर राहून कामावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.
फैजल खान मॉडेल मुस्कान कटारियाला डेट करत होता. दोघांनी डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. मुस्कानने फैजलवर चिट करण्याचा आरोप देखील लावला होता. या आरोपांमुळे फैजल पूर्णपणे निराश झाला होता. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, मागच्या रिलेशनशिपमध्ये त्याला जो त्रास मिळाला आणि त्याने जो कटू अनुभव घेतला तो खूपच त्रासदायक होता. सार्वजनिकरित्या त्याच्यावर जी काही चिखलफेक झाली त्यानंतर त्याचा प्रेमावरून विश्वास उठला आहे. आता त्याच्याकडे प्रेमासाठी वेळ नसून त्याला त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आजही तो सिंगलच आहे. भविष्यातही त्याला कोणाला डेट करायची इच्छा नाही.
पुढे फैजल या मुलाखतीमध्ये म्हणाला की, “सिंगल राहणेच उत्तम आहे. कारण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. ही वेळ योग्य नाही. भूतकाळात माझ्यासोबत जे काही झाले त्यानंतर तर अजिबातच नाही. मला नाही वाटत की, माझ्या नशिबात प्रेम आहे. मी माझ्या आयुष्यात खुश असून, मला टीव्ही इंडस्ट्रीचा सलमान खान व्हायचे आहे. असेही होऊ शकते की मी आयुष्यभर बॅचलर राहील.”
फैजल खानचे वडील रिक्षा चालवतात. फैजल जेव्हा डान्स इंडिया डान्समध्ये स्पर्धक बनून आला तेव्हा तो चर्चेत आला. १५ वर्षाच्या फैजलने त्याच्या डान्सने सर्वांची मने जिंकली आणि तो शोचा विजेता बनला. त्यानंतर त्याने ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. २०१६ साली त्याने ‘प्रेमकहाणी’ या मराठी सिनेमात काम केले. २०१९ मध्ये Modi: Journey of a Common Man नावाच्या वेबसिरीजमध्ये त्याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा