Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड शेवटी कलाकारही माणूसच! प्रसिद्ध कलाकारांना ‘हे’ चित्रपट केल्याचा आजही होतोय पश्चाताप

शेवटी कलाकारही माणूसच! प्रसिद्ध कलाकारांना ‘हे’ चित्रपट केल्याचा आजही होतोय पश्चाताप

अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) नुकताच प्रदर्शित झालेला ‘रनवे 34’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी फ्लॉप ठरला. या चित्रपटात अजयने अभिनयासोबतच दिग्दर्शनातही हात आजमावला आहे. अजय देवगणचा हा चित्रपट आधीच्या काही चित्रपटांपेक्षा चांगला असला तरी, ज्याची पुनरावृत्ती अजयला कधीच करायची नाही आणि त्याने या चित्रपटांचा भाग व्हायला नको होता हेही त्याने सर्वांसमोर कबूल केले आहे. अजय हा एकमेव बॉलिवूड स्टार नाही ज्याला त्याचे काही चित्रपट केल्याचा पश्चाताप होतो. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सर्वांसमोर मान्य केले आहे की त्यांनी काही चित्रपटात काम करायला नको होते. आज आम्ही तुम्हाला अशाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

शाहिद कपूर –

शाहिद कपूरला जेव्हा विचारण्यात आले की, आता कोणत्या चित्रपटाविषयी त्याला वाटते की त्याने करायला नको होता.  तर तो कोणता चित्रपट आहे.यावेळी त्याने चुप चुप के चित्रपटाचे नाव घेतले होते. हा चित्रपट करायला नको होता असे त्याने स्पष्ट केले होते.

सैफ अली खान –
सैफ अली खानने स्वतः ‘हमशकल्स’ (2014) करण्याबाबत सांगितले की “चित्रपटात अशी कोणतीही स्क्रिप्ट नाही, हे सर्व साजिदच्या मनात होते. त्याने मला जे सांगितले ते मी केले. माझी पत वाढवण्यास मदत होईल या विचाराने मी हा चित्रपट केला, पण अर्थातच माझी चूक होती. पुढे तो म्हणाला की चित्रपट पाहिल्यानंतर मी स्वतःला विचारले की मी यात काय करतो आहे? मला माहित आहे की मी माझ्या चाहत्यांना निराश केले आहे. ‘हमशकल्स’सारखी चूक मी कधीच पुन्हा करणार नाही.”

गोविंदा –
‘किल दिल’ (2014) या त्याच्या चित्रपटाविषयी बोलताना गोविंदा म्हणाला की, “त्याने ‘किल दिल’ या चित्रपटात भूमिका घेतली कारण त्याच्या कुटुंबाने तो मागे पडणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की मी माझ्या पत्नी आणि माझ्या मुलांना याबद्दल विचारले. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे त्याने अगदी प्रामाणिकपणे सांगितले. मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या त्या माझ्या वाट्याला येत नव्हत्या आणि मला ज्या प्रकारच्या ऑफर्स मिळत होत्या त्याकडे मी उत्सुक नव्हतो. माझ्या कुटुंबाने मला ऑफर घेण्यास सांगितले, अन्यथा मी मागे राहीन. या चित्रपटात गोविंदाने खलनायकाची भूमिका साकारली होती. पण स्क्रिप्ट खूपच कमकुवत होती, त्यामुळे चित्रपट चालला नाही.

अजय देवगण –
अजय देवगणलाही साजिद खानचा ‘हिम्मतवाला’ (2013) करण्याचा पश्चाताप झाला. आपली निराशा शेअर करताना तो म्हणाला की “चित्रपट फ्लॉप होणार हे त्याला आधीच माहीत होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला शूटिंग दरम्यान कळले होते की हा चित्रपट चालणार नाही. मी आजपर्यंत ‘हिम्मतवाला’ आणि ‘रास्कल्स’ पाहिलेले नाहीत. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईचे जसे रेट्रो स्टाईलमध्ये चित्रीकरण झाले होते त्याच पद्धतीने (हिम्मतवाला) चित्रपटाचे चित्रीकरण होईल असे मला वाटले. साजिदने काय केले की त्याने 80 च्या दशकातील एक चित्रपट घेतला आणि तो 80 च्या दशकातील शैलीत शूट केला. आजच्या स्टायलिश आणि पंच लाईनमध्ये ‘हिम्मतवाला’ बनवला असता तर चालला असता.”

अभय देओल – 

देव डी’ आणि ‘ओये लकी लकी ओये’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर, बॉलीवूड अभिनेता अभय देओलला आयशासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका करताना पाहून प्रत्येकजण थक्क झाला. अभय देओलने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मला आयशासारख्या चित्रपटाचा भाग बनायचे नाही. तो म्हणाला की, जेव्हा मी शूटिंग करत होतो तेव्हा मला जाणवलं की चित्रपटात प्रत्यक्ष अभिनयापेक्षा कपड्यांबद्दल जास्त आहे.”

इमरान हाश्मी –

इंडस्ट्रीमध्ये असे फार कमी कलाकार आहेत जे उघडपणे सांगतात की त्यांनी त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी चित्रपट केले, तो म्हणजे इमरान हाश्मी. त्याच्या ‘गुड बॉय बॅड बॉय’ (2007) या चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला की, त्याचे घर चालवण्यासाठी काही चित्रपट करावे लागले. ज्यामध्ये या चित्रपटाचा समावेश होता.

कॅटरिना कैफ –

अभिनेत्री कॅटरिना कैफलाही तिचा पहिला चित्रपट ‘बूम’ (2003) मध्ये काम करण्याचा पश्चाताप झाला. या चित्रपटाविषयी बोलताना कतरिना म्हणाली होती की, “हा एक उत्तम लॉन्चिंग पॅड नसेल, पण मला अमिताभ बच्चनसारख्या दिग्गज व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली. मी जेव्हा चित्रपट साईन केला तेव्हा मला भारतीय संस्कृती आणि परंपरेची माहिती नव्हती. मला भारताचा हा पैलू माहीत असता तर मी हा चित्रपट केला नसता. मी पुन्हा असे काही करणार नाही.”

ट्विंकल खन्ना –

‘मेला’ हा हिंदी चित्रपट जगतातील एक प्रचंड गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री ट्विंकल खन्नाने प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका साकारणे तिच्यासाठी चुकीचा निर्णय होता असे मत तिने एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा