आजपर्यत कोणी ‘शोले‘ चित्रपट पाहिली नाही असं फार कमी लोक आहेत. ‘शोले‘ हा त्या काळातील प्रसिद्ध आणि नावजलेला चित्रपट आहे. त्यातील अनेक डायलाॅग आजही लोकांच्या ओठांवर खेळताना दिसतात. एतकचं नाही तर त्यातील कलाकारंनी देखील आपल्या अभिनयच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची अशी जागा निर्माण केली आहे. ‘शोले‘ चित्रपटातील एक डायलाॅग ‘इतना सन्नाटा क्यूँ है’ हा आजही लोकांच्या ओठांवर येतो. आज आपण रहीम चाचाची भूमिका साकारणाऱ्या ए. के. हंगलबद्दल जाणून घेऊया.
2012 साली या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी अभिनेता ए.के. हंगलने (A.K Hangal) जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी खूप चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या हंगल यांचा जन्म 1 फेब्रुवारी1914 रोजी झाला आहे. ते सियालकोट (आता पाकिस्तान) येथे जन्मले आहेत.
ए.के. हंगल यांनी ‘तीसरी कसम’ चित्रपटाद्वारे बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. ए के हंगल यांनी 1929 ते 1947 दरम्यान देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ए.के. हंगल हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात सामील होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर हंगल यांचे संपूर्ण कुटुंब पेशावरहून कराचीला आले. जवळपास तीन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात घालवल्यानंतर हंगल 1959मध्ये मुंबईत परतले.
चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, त्यांनी ‘नमक हराम’, ‘शौकीन’, ‘शोले’, (Sholay)‘अवतार’, ‘अर्जुन’, ‘आँधी’, ‘तपस्या’, ‘कोरा कागज’, ‘बॅचलर’, ‘छूपा’, ‘रुस्तम’, ‘चितचोर’, ‘बालिका वधू’, ‘गुड्डी’ या चित्रपटांंमध्ये काम केले आहे. ए.के. हंगल यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 225 चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी त्यांनी राजेश खन्नासोबत 16 चित्रपट केले. 2012 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी ए.के. हंगल यांचे निधन झाले. (famous actor ak hangal death anniversary sholay rahim chacha struggle career films serials family lifestyle unknown facts)
अधिक वाचा-
–थिएटरमध्ये झाली अनुपम खेर आणि किरण खेरची मैत्री, पुढे आयुष्यभरासाठी बांधली रेशीमगाठ
–Breaking: बॉलिवूडला मोठा धक्का, ‘मैंने प्यार किया’ फेम ज्येष्ठ गीतकारांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा