Friday, September 20, 2024
Home मराठी प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक; अभिनेते म्हणाले, ‘बाबा तुम्ही जातानाही आम्हाला…’

प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक; अभिनेते म्हणाले, ‘बाबा तुम्ही जातानाही आम्हाला…’

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत डॉ. गिरीश ओक यांच्या वडिलांचे दु:खत निधन झाले आहे. त्यांच्या निधमामुळे ओके कुटुंबावर दु:खाचाज डोंगर कोसळला आहे. डॉ. गिरीश ओक यांच्या वडिलांचे नाव रत्नाकर दिनकर ओक आहे. त्यांनी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) त्यांचे निधन झाले आहे. या विषयी एक लांबलचक पोस्ट करून गिरीश ओक यांनी माहिती दिली आहे.

गिरीश ओक (girish oak) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केले आहे. पोस्ट शेअर करताना गिरीश ओक यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट करतामा लिहिले की, “काल माझे बाबा रत्नाकर दिनकर ओक ह्यांचं वयाच्या 93 व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच. माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर ह्या पदावर ते 1989साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही.”

तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा त्यांना यायच्या. ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे कपड्यांना इस्त्री सायकल स्कूटर घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे. तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो. त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो. माझी आई गंमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत. नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल. ती. बाबा शिरसाष्टांग नमस्कार” अशी पोस्ट ओक यांनी केली आहे.

या दरम्यान, मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारे अभिनेते म्हणून डॉ. गिरीश ओक यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

अधिक वाचा- 
ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा!
वाढदिवस विशेषः अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या नागराज मंजुळेंचा थक्क करणारा प्रवास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा