‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनय करून प्रत्येक घरातील व्यक्तीच्या मनाव आधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते आणि कवी, लेखक डॉ. गिरीश ओक गुरूवारी(17 ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. गिरीश ओक यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. गिरीश ओक यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मराठी हिट चित्रपट देखील दिले आहेत. चलातर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
टीव्ही अभिनेता म्हणून मनोरंजन उद्योगात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने ‘जस बाप तशी पोरा’द्वारे 1991मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. गिरीश ओक (Girish Oak) यांचा जन्म 17 ऑगस्ट 1960 साली झाला. त्यांच मुळ गाव नागपूरकर आहे. बालपणी त्यांना डॉक्टरकीची आवड होती. त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये डॉक्टरकीची डिग्री घेतली आहे. पण मन रमत नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांनी अभिनयाकडे तोंड वळवले.
माध्यमांशी बोलताना गिरीश ओक म्हणाले की, मी शाळेत असताना नाटक, अभिनय किंवा इतर गोष्टीकडे फार लक्ष देत नव्हतो. अभिनयाच्या आणि माझा दूर- दूरवर संबंध येत नव्हता. माझे वडिल एमएसईबीमध्ये नोकरी करत होते. आम्ही गावात राहत नव्हतो. माझी फॅमेली काॅलनीत राहिची. माझं शिक्षण देखील नाशिकमध्येच झालं. शाळेत असताना मी कधीच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेतला नाही. शाळा सुटली की मला पॉवर स्टेशनच्या कॉलनीत यावं लागायचे. त्यामुळे मी या गोष्टींंपासून लांब असायचो. मी आयुर्वेद वैद्यकीय शिक्षणासाठी नागपूरला आलो होतो.
कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नाटकासाठी ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. तेव्हा मी दिग्दर्शकांना एक विनंती केली की, ‘मी बॅकस्टेजची वगैरे सगळी कामं करेन. मला ग्रुपमध्ये घ्या.’ च्यावेळी त्यांनी मला घेतले आणि मी काॅलजच्या नाट्यविभागाचा एक भाग बनलो. त्यावेळी प्रोफेसर एस. बी. जोशी हे नाट्यविभागाचे प्रमुख होते आणि त्यांनी मला पाहाताच दिग्दर्शकांच्या कानात कुजबुदले. त्यांच्या सांगण्यावरूम मला दिग्दर्शकांनी नाटकात भूमिका दिली. ‘घेतलं शिंगावर’ हे नाटक मनोहर काटदरे यांनी लिहीले होते. त्यांत मी काम केले आणि पहिलं बक्षीस मिळवलं.
त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात सक्रिय झालो. पण मला घरातून या सर्व गोष्टी करण्यास नकार देण्यात आला होता. यावेळी मी नापास असा कुठलाही शिक्का न बसण्यासाठी खूप मेहनत केली. मी माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. 1977 ते 1983 या वर्षात मी नागपुरात प्रायोगिक, व्यावसायिक, झाडेपट्टी नाटकांत मी सक्रिय झालो. त्यानंतर त्यांनी ‘अपेक्षा’ या नाटकात काम केले. त्यावेळा एका पाठोपाठ एक ‘नाथ हा माझा’, ‘तुझं हे तुझ्यापाशी’, ‘वेगळं व्हायचंय मला’ अशी नाटक मिळत गेली.
मधल्या काळात गिरीश यांनी नाटकातून ब्रेक घेतला आणि गोडबोले हॉस्पिटलमध्ये आरएमओ म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी ‘साहेब विरुद्ध मी’ हे नाटक केले. त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. नाटकाच्या कथानकावर पुढे ‘खून भारी मांग’ हा सिनेमाही करण्यात आला. या नाटकानं मला सुरुवातीच्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर एक नट म्हणून खरी ओळख मिळवून दिली होती.
गिरीश ओक यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायच झाले तर, गिरीश यांच लग्न पद्मश्री पाठक यांच्यासोबत झाले होते. पण त्यांच नात फार काळ टिकू शकले नाही. त्यांंचा घटस्फोट झाला. 23 मार्च 2008 रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न गाठ बांधली. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे. तर पहिली मुलगा गिरीजा हा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (The life journey of famous Marathi actor Girish Oak)
अधिक वाचा-
–गुलजार यांना गॅरेजमध्ये काम करताना मिळाली बॉलिवूडमध्ये संधी, मेकॅनिक ते गीतकार असा आहे प्रवास
–संगीता घोष यांनी वयाच्या दहाव्या वर्षी केली करिअरला सुरुवात, ‘या’ नावाने आहे घराघरात प्रसिद्ध