Friday, December 6, 2024
Home मराठी ‘स्मशानात लागणारी लाकडं मी…’ , नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ; एकदा वाचाच

‘स्मशानात लागणारी लाकडं मी…’ , नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ; एकदा वाचाच

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नाना पाटेकर यांची भूमिका असलेला “व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल आणि आगामी करिअरबद्दल भाष्य केलं.

नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. खूप अनुभव घेतले आहेत. आता मी 67 वर्षांचा झालो आहे. मला माहित आहे की, माझे आयुष्य लवकरच संपेल. त्यामुळे मी स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत. मी माझ्या मृत्यूनंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी हे केले आहे.” त्याचे हे वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, “मी माझ्यासाठी 12 मन लाकडं ठेवली आहेत. कोणताच लाकूड थोड सुद्धा ओला नाही. माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडं वापरू नका, नाही तर सर्वत्र धूर होईल. या धूरामुळे अनेकांना त्रास होईल. तिथे जे कोणा पाहूणे किंवा मित्रमंडळी उपस्थित असतील त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. अशात अनेकांचा गैरसमज होईल की, जमलेले सगळे माझ्यासाठी खूप खूप रडत आहेत…”

नाना पाटेकरांच्या या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी त्यांची ही वक्तव्य स्तुती केली आहे तर काही लोकांनी त्यांना नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर हे नेहमीच आपल्या बोलण्याने आणि कृतीने चर्चेत असतात. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. (Famous actor Nana Patekar made a shocking statement about his own death)

अधिक वाचा-
पूनम पांडेच्या घराला लागली आग, घरात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यात आले यश
शशांक केतकरने पत्नीसाठी केली खास पोस्ट; चाहते म्हणाले, ‘खऱ्या आयुष्यातील रमाला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा