Monday, September 25, 2023

शशांक केतकरने पत्नीसाठी केली खास पोस्ट; चाहते म्हणाले, ‘खऱ्या आयुष्यातील रमाला…’

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर हाेय. शशांक सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. शशांकचे लाखो चाहते आहे. शशांकने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याची ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत तो प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत दिसला होता. त्यांची ही मालिका घराघरात पोहोचली होती. सध्या शशांक एका वेगळ्यात कारणामुळे चर्चेत आला आहे.

शशांकने (Shashank Ketkar) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअऱ केले आबे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शशांकने त्याच्या पत्नी प्रियांकासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. प्रियांकाचा आज वाढदिवस असून, यानिमित्त शशांकने तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

शशांकने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रियंका, तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य पूर्ण नाही. तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य पूर्ण झाले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.” शशांकच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक केल्या आहेत. चाहत्यांनी शशांक आणि प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “खऱ्या आयुष्यातील रमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” दुसऱ्याने लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.” सध्या शशांकची ही पोस्ट अनेकांच लक्ष वेधून घेत आहे. शशांक आणि प्रियांका हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. शशांक सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर प्रियांका ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (Famous actor Shashank Ketkar posted on wife Priyanka Dhawal birthday)

अधिक वाचा-
लग्नाच्या आधी माधुरी दीक्षितच्या पतीला माहित नव्हते तिचे सगळ्यात मोठे सिक्रेट, सत्य समजताच झाले शॉक
पूनम पांडेच्या घराला लागली आग, घरात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यात आले यश

हे देखील वाचा