Sunday, October 1, 2023

‘त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..’, नाना पाटेकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांची भारतात परत आणणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जगदंबा तलवार पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार आहोत. यावरून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट केली आहे. 

शिवरायांनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनंखं परत मिळावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच बैठक होणार आहे. या घोषणेनंतर मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केलेल्या एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन…जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…”

नाना पाटेकर यांनी आपल्या पोस्टमधून सरकारवर भ्रष्टाचारावर कारवाई करण्यास सांगितले आहे. नाना पाटेकर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरीही त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. ब्रिटनमधून वाघनखे आणण्यावरून टिप्पणी करतांना नाना पाटेकर यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे.

राज्यातील लाखो-कोटी शिवप्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेदरम्यान प्रजेवर अन्याय जुलूम करणाऱ्या आदिलशाही सरदार अफजल खान याचा कोथळा बाहेर काढला होता. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी जे शस्त्र वापरले होते, ते शस्त्र म्हणजे वाघनख. छत्रपती शिवरायांनी तेव्हा वापरलेली वाघनखे जी की ब्रिटीश सरकारच्या संग्रहालयात आहेत असे बोलले जाते, ती आता पुन्हा भारतात आणली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हे अतुलनीय यश आले आहे. (Nana Patekar opinion on the return of tigers used by Chhatrapati Shivaji Maharaj to India)

अधिक वाचा- 
‘फॅमिली प्लॅनिंगबाबत आमचे कुटुंब आम्हाला…’ विकी कौशलने केला मोठा खुलासा
आज हरपलं देह भान! भगवी वस्त्र अन् भस्म लावून अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वराचे दर्शन; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा