Saturday, June 29, 2024

‘प्रेक्षक 300 रुपयात चित्रपट का पाहतील?’, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केले खळबळजक वक्तव्य

प्रसिद्ध अभिनेते शशांक केतकरने मराठी सिनेसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. शशांकने ‘होणार सून मी या घरची…’ या मालिकेत काम केले. त्याने या मालिकेत श्री ची म्हणजेच जान्हवीच्या पतीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला. तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसत आहे. त्याच्या या मालिकेला देखील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

शशांक (Shashank Ketkar ) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. शशांकचे लाखो चाहते आहेत. शशांकने मालिकांसह मराठी चित्रपटांमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहे. शशांकने उत्तम नायक ते खलनायक अशा सर्व भूमिका साकारल्या आहेत. शशांक आता एक वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

शशांकने माध्यमांंशी संवाद साधताना चित्रपटांविषयी मोठे वक्तव्य केले आहे. मालिकांमध्ये कपड्यांसाठी, जेवणासाठी, शिफ्टसाठी झगडावं लागत असताना तू टीव्हीवर कसा रमतोस? या प्रश्नाचे उत्तर देताना शशांक म्हणाला की, मालिकांमध्ये काम करायला मला आवडते. ते माझं प्रेम आहे. मला ताण घेऊन काम करताना फार मज्जा येते.त्याबरोबरच मला सगळया व्यवस्थित गोष्टी असताना काम करायलाही आवडतं. मला चित्रपटात काम करायलाही आवडतं. पण टीव्हीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबाबत इंडस्ट्रीमध्येही तितका आदर नाही”

पुढे बोलताना शशांक म्हणला की, “सतत आपल्याकडे चित्रपट मिळतील या बद्दल मला काहीही माहिती नाही. पण मी हिंदी, तामिळमध्ये काम केलं तरी मी टेलिव्हिजन कायम करत राहीन. टेलिव्हिजन प्रेक्षकांपर्यंत सर्वाधिक पोहोचलं आहे. मात्र, शशांक केतकरच्या चित्रपटाचे 300 रुपयांचं तिकीट काढून लोक का बघतील, त्याच 300 रुपयात त्यांना ऋतिक रोशन दिसतोय. 300 रुपयात एखादा गहन चित्रपट पाहण्यापेक्षा मी वरुण धवनचा एखादा धमाल, टाईमपास असा चित्रपट पाहिल. एक प्रेक्षक म्हणून हा विचार लोकांच्या डोक्यात येणं सहाजिक आहे.” (Famous actor Shashank Ketkar made a big statement about the film)

अधिक वाचा- 
‘गली से ताली तक…’, सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताली’ वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित
अगगं! बंद खोलीत मोनालिसा आणि पवन सिंगने केले ‘ते’ कृत्य; प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा