Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन ‘गली से ताली तक…’, सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताली’ वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित

‘गली से ताली तक…’, सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताली’ वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित

भारतीय सिनेसृष्टीत अनेक चित्रपट आणि वेब सीरिज होत आहेत. आता आगळावेगळा विषय घेऊन एक नवीन वेब सीरिज आली आहे. तृतीयपंथीच्या जीवनावर आधारित वेब सीरिजचा टिझर रिलीज झाला आहे. तृतीयपंथी म्हणून जगभर ख्याती पोहोचलेल्या गौरी सावंत हिच्या आयुष्यावर ही वेब सीरिज आहे. गौैरी सावंतची भूमिका अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ आणि टाळी वाजवत असलेला सुष्मिताचा लुक खूप चर्चेत आहे. पण ही छबी आहे तृतीयपंथी गौरी सावंत हिची आहे.

सुष्मिता सेनने (Sushmita Sen ) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘ताली’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर खूप चर्चेत आला आहे. अभिनेत्री सुष्मिताने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “गली से ताली तक.. भारतातील तृतीयपंथीसाठी लढणाऱ्या गौरा सावंत यांची कथा सादर करत आहे.” सुष्मिता सेन स्टारर वेब सीरिज ‘ताली’ 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलीज होणार आहे. ही मालिका जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

“नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही कथा याच सर्व प्रवासाची आहे”, असे या टीझरमध्ये बोलले ऐकू येत आहे. तसेच “गाली से ताली तक”, “स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला हे तिन्हीही हवं आहे”, असे अनेक डायलॉग सुश्मिता सेन म्हणत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

‘ताली’ची निर्मिती अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी केली आहे. रवी जाधव हे त्याचे दिग्दर्शक आहेत. ‘ताली’ची कथा क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. अर्जुन सिंग बरन, कार्तिक डी निशानदार आणि अफिफा सुलेमान नाडियादवाला यांनीही याची निर्मिती केली आहे. ‘ताली’ ही तृतीयपंथी गौरी सावंतची कथा आहे, जिने तृतीयपंथीला थर्ड जेंडर म्हणून मान्यता मिळावी यासाठी लढा दिला. या संघर्षाचे परिणाम म्हणजे 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीना मान्यता दिली. (Sushmita Sen starrer ‘Tali’ web series teaser released)

अधिक वाचा- 
अगगं! बंद खोलीत मोनालिसा आणि पवन सिंगने केले ‘ते’ कृत्य; प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल
बाप रे! बाराशेपेक्षा अधिक गाणी गाऊन मिळवली प्रतिष्ठा, ‘त्या’ एका कृत्याने घालवली सगळी इज्जत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा