मराठी अभिनेता सुबोध भावे हा कायमच चर्चेत असतो. सुबोधनं मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. सोशल मीडियावर सुबोध नेहमी सक्रिय असतो. नुकतंच सुबोधनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
सुबोधनं (Subodh Bhave) नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हिरवेगार गवत, झाडी आणि सांबर दिसत आहे. या फोटोला सुबोधनं एक कॅप्शन दिलं आहे. त्यात तो म्हणतो, “जिंकणं पाहिलं नाही, हरणं मात्र पाहिली” सुबोधच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. काही चाहत्यांनी सुबोधच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.
सुबोधच्या या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “या हरणाने मन हरण केलं का? लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कलाकाराला आणखी काय जिंकायचे बाकी आहे? अप्रतिम फोटो” तर दुसऱ्याने लिहिले की, “तुम्हीच एकदा एक विनोद सांगितला होता.. या जगात फक्त जिंकणं असतं.. हरणं जंगलात असतात.. तीच दिसत असतील बहुतेक” या पोस्वर लाईकचा पाऊसच पडला आहे.
View this post on Instagram
मराठी अभिनेता सुबोध भावेचा आगामी संगीतमय चित्रपट ‘मानापमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकतेच पुण्यातील फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये पार पडला. सुबोध भावेने स्वतः या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘मानापमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष सारंग करणार आहेत. या चित्रपटात सुबोध भावेसोबत ऋचा मराठे आणि जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘प्रेमसुधा फिल्म्स’नं केली आहे. (Famous actor Subodh Bhave post on social media has gone viral)
आधिक वाचा-
–तब्बल ५०० चित्रपट करूनही अनुपम खेर यांना अजूनही शिकण्याची ओढ, केली मोठी इच्छा व्यक्त
–‘या’ कारणास्तव ललित प्रभाकरने दिली ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटला भेट; म्हणाला, ‘एक व्यक्ती म्हणून ..’