Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड सनी देओल हरवलाय, कुणाला सापडलाय? मतदार संघातील अजब पोस्टरबाजीची सर्वत्र चर्चा

सनी देओल हरवलाय, कुणाला सापडलाय? मतदार संघातील अजब पोस्टरबाजीची सर्वत्र चर्चा

प्रसिद्ध अभिनेता सनी देओलला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. त्यांने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने नुकतेच ‘गदर 2‘ मधून बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ‘गदर 2’ने (Ghadar 2) बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पण पंजाबमध्ये पुन्हा एकदा तो बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सनी देओलला शोधून आणणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

सनी देओलचे (Sunny Deol) असे पोस्टर्स लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. सनी देओल हा गुरुदासपूर-पठाणकोट लोकसभा मतदारसंघातून भाजपचा खासदार आहे. सनी देओल जेव्हापासून खासदार झाला, तेव्हापासून तो दोन्ही जिल्ह्यात पुन्हा दिसला नाही. त्यामुळे विकासकामेही झाली नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोवाच्या लोकांनी सरना बसस्थानकावर लावलेल्या सनी देओलच्या बेपत्ता पोस्टर्सबद्दल सतत संताप व्यक्त केला. यापूर्वी जिल्ह्यातील हलका, पठाणकोट आणि सुजानपूरमध्येही सनी देओल बेपत्ता झाल्याची पोस्टर लावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही भाजप खासदाराने जनतेच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते कधीही त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आले नाहीत.

त्यामुळे रविवारी पठाणकोट लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा लोकांचा रोष पाहायला मिळाला. आंदोलकांनी बसमधून प्रवास करून लोकांमध्ये पोस्टर्स वाटून ते बसमध्ये चिकटवले जेणेकरून त्यांचा संदेश त्यांच्या खासदारापर्यंत पोहोचू शकेल.सनी देओल खासदार झाल्यानंतर कधीही त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आला नाही किंवा त्यांनी या भागात कोणतीही विकासकामे केली नसल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या लोकांचा आरोप आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशा लोकांना कोणत्याही पक्षाने तिकीट देऊ नये, असे लोकांचे म्हणणे आहे. सनी देओलने लोकांना मूर्ख बनवून विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच भाजप खासदार सनी देओलला जो कोणी शोधून काढेल त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे आंदोलकांनी सांगितले. (famous actor sunny deol bjp mp missing posters in pathankot viral photo social media fans comment)

आधिक वाचा-
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 10व्या दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
अभिनेत्री रवीना टंडनने मागितली श्रीदेवीच्या मुलीची माफी; म्हणाली, ‘मी क्षमा मागते…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा