अभिनेत्री रवीना टंडनने मागितली श्रीदेवीच्या मुलीची माफी; म्हणाली, ‘मी क्षमा मागते…’

90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे लाखो चाहते आहे. रवीनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोहीही करण्यास तयार असतात. सध्या रवीना एक वादात सापाडली आहे. अलीकडे अभिनेत्री रवीनाने चुकून एक पोस्ट लाइक केल्यामुळे वादात अडकली आहे. रवीना टंडन झोया अख्तरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चीज’ चित्रपटातील ट्रोलिंग पोस्टला चुकून लाईक केल्यामुळे नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे.

दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि खुशी कपूर यांची माफी मागितली आहे. ‘द आर्चीज’च्या ट्रोलिंग पोस्टला चुकून लाईक केल्यानंतर रवीना टंडनने स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रवीना टंडनने लिहिले की, ‘टच बटण आणि सोशल मीडिया, एक वास्तविक चूक अतिशयोक्तीपूर्ण झाली आहे. हे लाईक चुकून केले गेले होते, आणि असे काहीतरी होते ज्याबद्दल मला माहित नव्हते. स्क्रोल करताना ते लाईक केले गेले. त्यामुळे, कोणत्याही गैरसोयीबद्दल आणि दुखावल्याबद्दल मी मनापासून दिलगीर व्यक्त करते.”

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ (The Archies) चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. ज्यामध्ये अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर दिसत होते. या पोस्टवर ‘अॅक्टिंग डेड हेयर’ असे कॅप्शन होते. रवीना टंडनने चुकून ही पोस्ट लाईक केली होती. यानंतर नेटिझन्स आणि ट्रोलर्सनी अभिनेत्रीवर कमेंट करण्यास सुरुवात केली. आता रवीना टंडनने चुकून लाईक झालेल्या पोस्टवर आपले स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात अगस्त्य नंदा, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांनी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात केली आहे. (Actress Raveena Tandon apologized to Sridevi daughter Khushi Kapoor)

आधिक वाचा-
‘अ‍ॅनिमल’मधील लग्नातल्या ‘त्या’ सीनवर वाद वाढताच बॉबी देओलने तोडले मौन, म्हणाला- ‘मला काही…’
रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 10व्या दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई