Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘इंटिमेट सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?’ प्रिया बापटच मोठ भाष्य, “उमेशपेक्षा…”

मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि ओटीटी विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया बापटचा होय. प्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच आपलेसे केले आहे. आज ती मराठी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियाने मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमधून तिने तिच्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. काही दिवसांपुर्वी प्रिया निर्मिती क्षेत्रात देखील उतरली आहे.

प्रिया ( Priya Bapat) सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय आहे. सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या पोस्टवर चाहते देखील कमेंट आणि लाइकचा वर्षाव करत असतात. प्रियाने काही बोल्ट सिन देखील दिले आहेत. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल देखील केले गेले आहे. या बोल्ड सीन संदर्भात प्रियाने एक भाष्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना प्रिया म्हणाली की, “मी आणि उमेश नेहमीच बोल्ड आणि इंटिमेट सीन असेल तर त्याबद्दल एकमेकांना सांगतो. पण आत्तापर्यंत उमेशपेक्षा मीच असे सीन्स खूप केले आहेत. मी केलेल्या सीरिजमध्ये आणि आगामी काही हिंदी चित्रपटात देखील बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आहेत.”

तसेच ती पुढे बोलताना म्हणाली की, “मी आणि उमेश एकाच क्षेत्रातील असल्यामुळे असे प्रसंग किती टेक्निकल असतात, हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे. ते सीन कसे चित्रीत केले जातात हे देखील आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टीकडे एक कामाचा भाग म्हणून पाहतो.”

प्रिया बापट विषयी बोलायच झाल तर, प्रियाने ‘वजनदार’, ‘टाईमपास 2’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटांत अभिनय केला आहे. तसेच प्रिया ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही झळकली होती.

अधिक वाचा- 
– श्वेता त्रिपाठीच्या ‘या’ बोल्ड वेबसिरीज पाहणार असाल तर एकट्याच पाहा बरं का!
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? श्रेयस तळपदेने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; एकदा पाहाच

 

हे देखील वाचा