Saturday, January 18, 2025
Home मराठी “…मी नशीबवान आहे कारण माझा…” प्रिया बापटने शेअर केलेला ‘तो’ खास व्हिडिओ झाला व्हायरल

“…मी नशीबवान आहे कारण माझा…” प्रिया बापटने शेअर केलेला ‘तो’ खास व्हिडिओ झाला व्हायरल

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रियाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रिया ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती कायमच तिच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते.

प्रियाचा (Priya Bapat) सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ती विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रिया फिटनेसबाबत कमालीची जागरूक आहे. ती सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ शेअर करते. डान्सिंग रीलही सोशल मीडियावर शेअर करून तिनं आपल्या फॅन फॉलॉइंगची यादी आणखीनंच वाढवल्याचं दिसून येत आहे. त्यावर तिचे चाहते भरभरून कमेंट करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया या व्हिडीओला भन्नाट कॅप्शन देत लिहिते, “घर, जिथे आपली स्वप्नं फुलतात… मी नशीबवान आहे. कारण या शहरात माझा जन्म झाला आहे. दादरच्या एका चाळीत मी लहानाची मोठी झाले आहे आणि आज देशभरातून मला प्रचंड प्रेम मिळत आहे. या जागेने, शहराने मला सर्वकाही दिले आहे. मी कायम ऋणी असेन…”

तसेच तिने चाळीतल्या घरात तिचे गणपतीसाठी तिचे कुटुंबीय कुठे सजावट करायचे आणि अभ्यास करण्याचे ठिकाण कुठे होते याची माहिती दिली आहे. तसेच या वेळी बोलताना ती म्हणाली की, “शिवाजी पार्क आणि दादर म्हणजे माझं प्रेम. आज मी जे काही आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या शाळेला जाते,” असे प्रियाने व्हिडीओच्या शेवटी म्हणाली.

दरम्यान, प्रियाने एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुन्या आठवणीना उजाळा देत आहे. प्रियाने बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्याचवेळी तिने आपल्या बालपणीच्या चाळीतल्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडिओतून तिने आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स तिने कुठे केला हे सांगितले आहे. (Priya Bapat shared ‘That’ video share)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे’, नसीरुद्दीन शाह यांचे मोदी सरकारवर सडेतोड आराेप
विकी काैशल अन् सारा दिसले रोमँटिक अंदाजात, फाेटाे व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा