Saturday, June 29, 2024

धक्कादायक! सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण; बेल्ट आणि बांबूच्या काठीने चोप दिल्यानंतर…

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. सई तिच्या अभिनयामुळे सतत चर्चेत येते. इतकचं नाही तर सई तिच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील काही ना काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरत असते. पण सध्या सई एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. सईच्या ड्रायव्हर बेदम मारहाण करण्यात आली आहे.

झालं असं की, सईचा (Sai Tamhankar) ड्रायव्हर सद्दाम मंडल हा मालवणी परिसरात गाडी चालवत होता. 13 ऑगस्टला रोजच्या प्रमाणे 12 वाजता मोटार सायकलवरुन ते कामावर गेले. तेथून रात्री दहाच्या सुमारास ते घरी परत येत होते. एक व्यक्ती मुद्दाम गाडी वाकडीतिकडी करुन पळवत होता. त्याच्या मागे अजून एक जण बसला होता. त्यावेळी ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत होता. त्यामुळे त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने ड्रायव्हरला शिवीगाळ केली. त्यावेळी आणखी दोनजण तिथे गाडीवर आले आणि त्या ड्रायव्हरला बेल्ट आणि बांबूच्या काठीने मारहाण केली.

त्यावेळी तिथे त्याचे मित्र आले त्यांनी ड्रायव्हरची मदत करण्याचा प्रयत्न केले. इस्माईल खान आणि राजीव अन्सारी भांडण सोडवायली. या भांडणात इस्माईल खानही देखील गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करण्यांपैकी एकाचे नाव मलिक असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मंडल आणि खान यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरू केली आहे.

सई ताम्हणकरच्या कामाविषयी बोलायच झाले, तर तिने ‘गर्लफ्रेंड’, ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘मिमी’, ‘प्यार वाली लव्ह स्टाेरी’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती. (Famous actress Sai Tamhankar driver brutally beat Saddam Mandal)

अधिक वाचा- 
चाहते असावे तर असे! ‘बिग बॉस’ विजेता बनताच 1001 गाड्यांचा ताफा अन् हजारोंच्या गर्दीकडून एल्विशचे जंगी स्वागत
राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या घरातून आलीये मनीषा कोईराला, कर्करोगाने लावला करिअरला ब्रेक

हे देखील वाचा