Tuesday, September 26, 2023

अभिनेत्री सई ताम्हणकरला पाहिजे ‘असा’ जोडीदार; म्हणाली, ‘जी व्यक्ती…’

मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सई कधी तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. अनेकादा कलाकारांच्या लग्नाचा विषय निघाला की, कलाकार बोलण टाळत असतात. पण सईने मात्र, लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

सई (Sai Tamhankar) रिलेशनशिप, अफेअर, लग्न याबाबत अनेकदा भाष्य करताना दिसते. त्यामुळे ती चर्चेत येत असते. सई नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा तिने तिला तिच्या लग्नाबद्दल काही प्रश्न विचाण्यात आले. या वेळा सईला विचारले की, अनुरुप जोडी असण्यासाठी काही गुण जुळवावे लागतात. तुझ्यामते असा कोणता गुण आहे, जो तडजोड करणं अजिबात शक्य नाही.

या प्रश्नाचे उत्तर देताना सई म्हणाली की, “स्वत: मध्ये स्व: ठेवून रिलेशनशिपमध्ये जगणं हे फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपून रिलेशनशिप जपायला हवं. जो व्यक्ती स्वतःसोबत आपल्या जोडीदाराचेही स्वत्व ही जपतो, असा जोडीदार असणं खूप गरजेचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 दरम्यान, चाहते सईची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. सई सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील अपडेट सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. सईची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सईने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सईचा दुनियादारी हा चित्रपट खुप प्रसिद्ध झाला आहे. (The video of Marathi actress Sai Tamhankar statement about her partner has gone viral on social media)

अधिक वाचा-
‘या’ कारणामुळे गाण्यातच रमले किशोर कुमार; वाचा संगीताच्या बादशाहचा जीवनप्रवास
सहाय्यक अभिनेता म्हणून अरबाज खानने केलेली करिअरला सुरुवात, भावाच्या साथीने गाठले यशाचे शिखर

हे देखील वाचा