कलाविश्वात आपल्या विनोदाने हसवण्याचे कसब असणाऱ्या प्रसिद्ध विनोदवीरांमध्ये कपिल शर्मा, जॉनी लिव्हर, सुनील ग्रोव्हर यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश होतो. या विनोदवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदाने पोट धरून हसायला भाग पाडले आहे. यात आणखी एका विनोदवीराचा समावेश होतो, तो म्हणजे संकेत भोसले. संकेत नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडिओंना चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते. अशातच बुधवारी (०३ फेब्रुवारी) त्याने शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडिओने चाहत्यांना लोटपोट करून सोडले.
काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओत काही पुरुष खुर्च्यांवर बसलेले दिसत आहेत. तसेच महिला धावत येऊन त्यांना किस करत पळून जात आहेत. त्यांच्या कपड्यांवरून हा व्हिडिओ भारतातील असल्याचे म्हटले जात आहे.
त्याने हा व्हिडिओ शेअर करत कमेंटमध्ये “ही कसली स्पर्धा आहे?” असे लिहिले आहे. त्यासोबतच त्याने हसण्याच्या इमोजींचाही समावेश केला आहे. या व्हिडिओवर युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा चांगलाच पाऊस पाडला आहे.
संकेतने (Sanket Bhosale) शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २० हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
व्हिडिओ पाहून युजर्सनी केल्या मजेशीर कमेंट्स
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, “मला वाटते की, लोक खूप बोर होत आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आपल्या पत्नीला किस करणे स्पर्धा नाही, तर हिंमतीचं काम आहे.” काहींनी तर हा व्हिडिओ पाहून ‘चुम्मालिंपिक्स’ असंही नाव दिले आहे. तसेच काहींनी याला ‘किसींग स्पर्धा’ असेही म्हटले आहे. त्याचबरोबर युजर्स म्हणाले की, “असे व्हिडिओ तू आणतो तरी कुठून?”
मागील वर्षीच कॉमेडियन सुगंधा मिश्रासोबत बांधली होती लग्नाची गाठ
संकेत भोसलेने आपली गर्लफ्रेंड आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रासोबत (Sugandha Mishra) मागील वर्षी म्हणजेच २६ एप्रिल, २०२१ रोजी लग्नाची गाठ बांधली होती. कोरोना काळात झालेल्या त्यांच्या लग्नात जवळच्या काही लोकांनीच हजेरी लावली होती. या दोघांनीही ‘द कपिल शर्मा शो’सारख्या मोठ्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.
हेही वाचा-