‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा‘मध्ये ‘गुत्थी’ आणि नंतर ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये ‘डॉ झटका’ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ‘युनायटेड कच्छे’ या नवीन वेबसिरीजद्वारे परतला आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला सुनील ग्रोव्हर शाहरुख खानच्या आगामी ‘जवान‘ या चित्रपटातही दिसणार आहे. या सगळ्याशिवाय तो कपिल शर्मासोबत टीव्हीवर कधी कमबॅक करतोय हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सूक आहेत. अशात नुकतेच काॅमेडियनने याबाबत मौन सोडले असून सत्य काय आहे ते सांगितले आहे.
सुनील ग्रोव्हर (sunil grover) बऱ्याच दिवसांपासून कपिल शर्माच्या शोचा भाग नाही. शोमध्ये त्याने आपल्या कॉमेडीने लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अशात सर्व जुन्या तक्रारी विसरून दोघांमधील मैत्री आणि सुनील ग्रोव्हरचे नवे रूप पुन्हा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहे. अशात याबाबत नुकतेच सुनील ग्रोव्हरने मौन तोडले आहे.
Zee5 च्या नवीन सिटकॉम ‘युनायटेड कच्च्या’ च्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या सुनील ग्रोवरने कपिल शर्मा शोमध्ये दिसण्याबाबत आपले मत मांडले. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्याला कपिलच्या शोमध्ये पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘सध्या तर असे काहीच नाही… हवे तर तुम्ही विचारून घ्या…’
कॅमेडियन पुढे म्हणाला, “सध्या तर मी खूप व्यस्थ आहे आणि जे करत आहे त्यात आनंदी आहे. मी नॉन-फिक्शन कामाचा खूप आनंद घेतला आहे, आता मी फिक्शनचा आनंद घेत आहे. कलाकार म्हणून नवीन अनुभव मिळत आहेत. मला मजा येत आहे. याशिवाय अजून कोणतीही योजना नाही.”
सुनील ग्रोव्हर त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युनायटेड कच्छे’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. त्याची ही वेबसिरीज बेकायदेशीर स्थलांतरितवर आधारित आहे. G5वर रिलीज झालेली ही 8 भागांची सिरिज पाहण्यासारखी आहे, सुनील ग्रोव्हर या सिरीजमध्ये अगदी नव्याच स्टाईलमध्ये दिसत आहे.(famou`s comedian sunil grover aka doctor jhatka breaks silence to work with kapil sharma again says i am also busy right now and enjoying )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?