‘किस करण्यासाठी काय गरजेचे आहे?’ कपिल शर्माच्या प्रश्नावर ऋतिक रोशनने दिले भन्नाट प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

What Is Required To Do A Kiss When Comedian Kapil Asked Hrithik Roshan This Question See What Was His Response


सर्वात यशस्वी कॉमेडी शोपैकी एक असणाऱ्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोने सर्वत्र आपली ओळख निर्माण केली आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमने चाहत्यांना खदखदून हसवण्याचे काम लिलया पार पाडले आहे. त्याच्या या शोमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्व मंडळी हजेरी लावत असतात. या शोमध्ये खेळवण्यात येणारा ‘के भईल करोडपती’ पाहून प्रत्येक प्रेक्षक आपले हसू रोखू शकत नाही. या खेळात नेहमीच सेलिब्रिटी येत असतात. याचा असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ‘मोहेंजोदारो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला सुपरस्टार ऋतिक रोशन, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांनी भाग घेतला होता.

‘के भईल करोडपती’दरम्यान कपिल शर्माने ‘घत्रूघन’ बनला होता. यादरम्यान त्याने वेगवेगळे प्रश्न विचारत चाहत्यांचे मनोरंजन केले. असाच एक प्रश्न त्याने ऋतिकने चित्रपटात पूजाला किस केल्याबद्दल विचारला होता. त्याने विचारले होते की, “किस करण्यासाठी काय गरजेचे आहे?” याचे पर्याय होते, १- अंधार, २- नीयत, ३- संधी आणि ४- राजकीय दबाव. हा प्रश्न ऐकताच ऋतिक रोशन आणि पूजा खदखदून हसू लागले. यानंतर ऋतिक प्रत्युत्तर देत म्हणाला होता की, “दिग्दर्शकाचा दबाव.” म्हणजेच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या दबावात त्याने पूजाला किस केले होते.

यानंतर कपिल शर्माने दुसरा प्रश्न चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना विचारला होता. त्याने विचारले होते की, “फ्रायडेमध्ये ‘डे’ किती फ्राय असतो?” याचे पर्याय होते, १- एक किलो, २- दोन किलो, ३- तीन किलोमीटर आणि ४- इतके किलो (हात पसरत). हा प्रश्न ऐकत आशुतोष यांनी लाईफलाईन घेतली.

ऋतिक आणि आशुतोष यांच्यानंतर त्याने पूजाला प्रश्न विचारला की, “ते ते आहे आणि काय काय आहे, मग ते काय आहे?” याचे पर्याय होते, १- दिस इज दिस, २- दिस इज दॅट, ३- दिस इज इट आणि ४- दिस इज (गोळी चालण्याचा आवाज येतो). हे ऐकून सर्वजण हसू लागतात.

कपिलने आपल्या कॉमेडी शोव्यतिरिक्त चित्रपटातही काम केले आहे. त्याने ‘किस किसको प्यार करू’ आणि ‘फिरंगी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.