Wednesday, June 26, 2024

Gautami Patil: ‘घोटाळा झाला’ने केल मार्केट जाम; गौतमीच्या नव्या गाण्याची तरुणांना भुरळ

आपल्या डान्सच्या तालावर प्रत्येकाला नाचायला लावणारी प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील होय. गौतमी पाटीलला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. गौतमी पाटील सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. नृत्यांगणा गौतमी पाटील हिची लावणी, गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. तिच्या गाण्यांमध्ये तिच्या नृत्यशैलीचा आणि अदांचा एक वेगळाच तडका असतो.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच (gautami patil) ‘दिलाचं पाखरू’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. आता तिचं ‘घोटाळा झाला’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘घोटाळा झाला’ हे गाणं वैष्णवी आदोडेनं गायलं आहे. संकेत मेस्त्री यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अतुल भालचंद्र जोशी आणि सिद्धेश कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.

या गाण्यात गौतमी काळ्या रंगाच्या साडीत, गोल्डन ज्वेलरी आणि मोकळे केस घालून दिसत आहे. तिच्या या लूकवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे. या गाण्यामध्ये गौतमीचा नृत्यप्रदर्शनही खूप सुंदर आहे. तिच्या या नृत्यशैलीने नेटकरी भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक व्हिडिओ रिल्स बनवले जात आहेत.

गौतमी पाटील यांची लावणी गाणी नेहमीच चर्चेत असतात. तिच्या गाण्यांमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली आहे. तिच्या आगामी गाण्यांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गौतमी पाटील ही तिच्या अदा आणि नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये नृत्य केले आहे आणि तिची गाणी नेहमीच लोकप्रिय ठरतात. गौतमीच्या “माझा कारभार सोपा नसतोय रं”, “दिलाचं पाखरू”, “सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम”, “पाटलांचा बैलगाडा” या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. ( famous dancer gautami patil new song ghotala out viral on social media)

आधिक वाचा
चाळीशी नंतरही सर्वांना हेवा वाटावा, असा फिटनेस ठेवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे ‘हे’ वेड लावणारे फोटो पाहिलेत का?
‘दृश्यम’ फेम इशिता दत्ताने केले ग्लॅमरस फोटोशूट, एकदा पाहाच

हे देखील वाचा