Wednesday, February 21, 2024

‘मजहब इंसानों के लिए बनता है…’, ओम पुरींचे ते डायलॉग, जे आजही चाहत्यांच्या मनावर करताहेत राज्य

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत, दिवंगत अभिनेते ओम पुरी ज्यांनी आपल्या विलक्षण अभिनयाद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यांची बुधवारी (18 ऑक्टोबर) जयंती आहे. ओम पुरी आज या जगात राहिले नसले, तरीही त्यांचा दमदार आवाज आणि अभिनय अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. चहाच्या दुकानात भांडी धुण्यापासून ते चित्रपट जगतात ओळख निर्माण करण्यापर्यंत, ओम पुरी यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. केवळ त्यांचे व्यावसायिकच नाही, तर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप संघर्षमय होते. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रपटातील गाजलेले डायलॉग जाणून घेऊया.

चार दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत ओम पुरी (Om Puri) यांनी हिंदी आणि इंग्रजी ते कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आणि सर्वत्र आपली छाप सोडली आहे. आज आपण त्यांच्या चित्रपटांचे काही प्रसिद्ध डायलॉग पाहूया जे अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत.

“मुझे कोई नहीं मार सकता… न आगे से, न पीछे से, न दाएं से, न बाएं से… न आदमी, न जानवर, न अस्त्र, न शस्त्र.” 1991 मध्ये आलेल्या ‘नरसिंग’ चित्रपटाचा हा डायलॉग आहे.

“मरने से पहले मेरे बाल डाय करा देना, आई वॉन्ट टू डाय यंग.” त्यांच्या ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटातील हा डायलॉग आहे. हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता.

‘मैं ऐसे लोकतंत्र में विश्वास नहीं करता… जो गरीबों की इज्जत करना नहीं जानता’ ‘चक्रव्यूह’ हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केला होता.

‘हर इंसान को जिंदगी में एक बार प्यार जरूर करना चाहिए… प्यार इंसान को बहुत अच्छा बना देता है’. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातील हा डायलॉग आहे.

“जिस दिन पुलिस की वर्दी का साथ पकड़ा… उस दिन डर का साथ छोड़ दिया.” ‘अग्निपथ’ हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर195 कोटींची कमाई केली होती.

“मजहब इंसानों के लिए बनता है… मजहब के लिए इंसान नहीं बनते.” ‘ओह माय गॉड’ या चित्रपटातील हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे.

“जंग कोई भी हो, नतीजा कुछ भी हो… एक सिपाही अपना कुछ ना कुछ खो ही देता है.” ‘चायना गेट’ चित्रपटातील हा डायलॉग आहे.

ओम पुरी यांचे बालपण खूप संघर्षमय होते. पंजाबी कुटुंबात जन्मलेले ओम पुरी यांचे वडील रेल्वेत नोकरी करत होते. परंतु, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. ज्यामुळे त्यांनी कोळसा उचलण्याचे काम केले. चहाच्या स्टॉलमध्ये भांडी धुण्याचे काम केले. ओम पुरी यांना चोरीच्या आरोपावरून ढाब्याबाहेर काढण्यात आले आणि नंतर काळाने असे वळण घेतले की, ते रस्त्यांवरून बॉलिवूडमध्ये पोहोचले आणि नंतर आपल्या चमकदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले. (Famous dialogues of late actor Om Puri from Bollywood to Hollywood)

आधिक वाचा- 
करण जोहर पुरस्कार स्वीकारताना विवेक अग्निहोत्रींची अजब प्रतिक्रिया; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला मोठी ऑफर; म्हणाली, ‘भारताला हरवलं, तर मी तुमच्यासोबत…’

हे देखील वाचा