Monday, February 26, 2024

पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला मोठी ऑफर; म्हणाली, ‘भारताला हरवलं, तर मी तुमच्यासोबत…’

एकदिवसीय विश्वचषक 2023मध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता. या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने बांगलादेश खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे. टीम इंडिया गुरूवारी (19 ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशच्या खेळाडूंना तिच्या माध्यमातून ऑफर दिली आहे.

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी (15 ऑक्टोबर) पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी ( Seher Shinwari ) म्हणाली की, “इंशाअल्लाह माझे बंगाली मित्र पुढच्या सामन्यात आमच्याकडून बदला घेतील. जर त्याचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला. तर मी बंगाली मुलासोबत फिश डिनर डेट करेन.” सेहर शिनवारी ही पाकिस्तानी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बांगलादेशचा संघ भारताला पराभूत करण्यास सक्षम आहे का? हे पाहणे आता औत्सुक्याचे असेल. जर बांगलादेशचा संघ भारताला पराभूत केला तर सेहर शिनवारीची ऑफर पाळणार का हे पाहणं देखील म्हणत्वाचे आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवाने पाकिस्तानी चाहत्यांना मोठा धक्का बसला. या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे. सहार हिने केलेली पोस्ट आणि या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून खूप ट्रोल केले जात आहे. सहारने भारतीय क्रिकेट संघाबाबत अशी विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ती प्रसिद्धीझोतात येण्यासाठी अशी विधाने केली आहेत. भारतीय चाहते देखील तिला ट्रोल करत असतात.

 टीम इंडियाने वर्ल्ड (World Cup 2023) कपमधील पहिले तीनही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. चेन्नईत मेन इन ब्लू संघाने कांगारू संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने तिन्ही सामने धावांचा पाठलाग करून जिंकले आहेत. आता संघाला पुढील सामने बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत. (Pakistani actress Seher Shinwari has made a big offer to Bangladeshi players)

आधिक वाचा-
‘फुकरे 3’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; जाणून घ्या 20 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
करण जोहर पुरस्कार स्वीकारताना विवेक अग्निहोत्रींची अजब प्रतिक्रिया; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हे देखील वाचा