Saturday, February 22, 2025
Home कॅलेंडर कोळी-आगरी गीतांचा ठेका हरपला! ‘वेसावची पारू’, ‘मी हाय कोली’ फेम गीतकार काशिराम चिंचय यांचे निधन

कोळी-आगरी गीतांचा ठेका हरपला! ‘वेसावची पारू’, ‘मी हाय कोली’ फेम गीतकार काशिराम चिंचय यांचे निधन

सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी गीतांचे बादशहा शाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे शनिवारी (१५ जानेवारी) पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असतानाच ७१ वर्षीय कोळी गीतांच्या बादशहाने अखेरचा श्वास घेतला.

काशीराम लक्ष्मण चिंचय (Kashiram Chinchay) यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात्त त्यांची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित मुली आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, काशीराम लक्ष्मण चिंचय गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्याचमुळे त्यांना अंधेरी येथील ‘ब्रह्मकुमारी’ या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काशीराम चिंचय यांनी कोळी-आगरी समाजातील पारंपरिक गीतांचा ठेका सातासमुद्रापार नेला. काशीराम लक्ष्मण चिंचय यांची चित्रपटसृष्टीत भलीमोठी ओळख आहे. त्यांनी कोळीगीते सातासमुद्रापार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक कोळीगीते गायली. ज्यामध्ये ‘डोल डोलतंय वाऱ्यावर माझी’, ‘डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला’, ‘वेसावची पारू’, ‘हिच काय गो गोरी गोरी’ यांसारख्या अनेक गीतांचा समावेश आहे. काशिराम चिंचय यांच्या निधनाने आगरी-कोळी समाजावर शोककळा पसरली असून, लोकसंगीतात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

‘वेसावकर आणि मंडळी’ या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे व्हीनस म्युझिक कंपनीच्या वतीने निर्मिती केलेले अनेक संगीत अल्बम्स गाजले. ‘बस नाम ही काफी हैं..’ ‘वेसावकर आणि मंडळी’ची ख्याती सातासमुद्रापार पसरली. काशीराम चिंचय यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा