Sunday, December 3, 2023

‘माझ्या मुलीकडे बघताना लोकांची लाळ गळत होती आणि…’, अतिशा नाईक यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

आजकालच्या दुनियेत कधी, कोण, कुठे आणि कशी स्टाईल करेल हे सांगताच येणार नाही. सध्याच्या ग्लॅमरस दुनियत एका पेक्षा एक स्टाईलमधील लोक पाहायला मिळतात. मुल आणि मुली देखील अनेकदा सिनेसृष्टील कलाकारांसारखी कपडे घालता. पण तुम्ही देखील अनेकदा शाॅर्ट कपडे घातल्यामुळे मुलींना वाईट प्रसंगाला सामोरे जाव लागत असे, ऐकले असेल. पण हे खरचं योग्य आहे का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नुकताच मराठमोळ्या अभिनेत्री अतिशा नाईक यांनी यारून एक किस्सा शेअर केला आहे. जो सर्वांचे लक्ष वेधत आहे.

अतिशा नाईक (atisha naik ) यांना एक मुलगी आहे. अतिशा नाईक यांनी नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मत मांडले. यावेळी बोलताना त्या म्हणल्या की, “मी माझ्या मुलीच्या कोणत्याही गोष्टीत मधे मधे लुडबुड करत नाही. मी तिला स्पष्ट सांगितले आहे. तुला जे कपडे घालायचेत ते घाल. जशी फॅशन करायची आहे तशी कर. पण हे सगळग करत असताना तुला अनेकदा वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागेल आणि त्याला भिडण्याची ताकद तिच्यात असेल तर कर. तुमच्या ती ताकद असेल तर तुम्ही काहीकी करू शकता.” असे म्हणत त्यांनी मुलीकडे लोक कसे वाईट नजरेने बघत होते, याचा खुलासा केला आहे.

तसेच पुढे बोलताना म्हणाल्या की, “मी माझ्या मुलीबरोबर अनेकदा फिरायला जाते. त्यावेळी मी तिच्याकडे अनेक लोक पाहतात हे बघतात हे पाहीले आहे. पण ते नुसते पाहतचं नाही तर तिच्याकडे पाहताना अशी लाळ गळतीये लोकांची. असं स्पष्टपणे बोलल्याबद्दल माफ करा. पण हे खर घडल आहे. एकदा तर मी एकाला खडसावले देखील होते. समोर बघुन चाल खड्डा आहे, मागे तिच्याकडे बघण्याच्या नादात पडशील. मी फक्त सांगू शकते. त्यामुळे काय करायचं, काय घाल किंवा काय करायचं नाही हा निर्णय ज्याचा त्याचा आहे.”

अतिशा नाईक यांच्या कामाविषयी बोलायचं झाले तर, ‘घाडगे अँड सून’, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. (Famous marathi actress atisha naik talks about bad experience people were stalking her daughter)

अधिक वाचा-
साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!
अभिनेता आर.माधवनची FTIIच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अनुराग ठाकुर ट्विट करत म्हणाले…

हे देखील वाचा