‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…


सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही होय. या मालिकेने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. 9 चा ठोका वाजला की, घराघरात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही एकच मालिका चालू असते. या मालिकेतील पात्र, त्यांचा संवाद, वेशभूषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंत‌ पडतात. त्यातील लतिका आणि तिच्या सासूचे पात्र तर सर्वांना खूप भावतं. त्याचे प्रेम आणि माया पाहून घराघरातील सासू-सूनेमधील प्रेम जागे झाले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रामधील प्रेम आणि जिव्हाळा जेवढा ऑनस्क्रीन आहे, तेवढाच तो ऑफस्क्रीन देखील पाहायला मिळतो. (Sundara manamadhe bharali fame akshaya naik share a photo with atisha naik)

या मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग दाखवला जाणार आहे. यामधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये‌ ऑनस्क्रीन सासू-सुनेचे म्हणजेच इंदूची भूमिका साकारणारी अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यातील जबरदस्त ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

या मालिकेत या दोघींचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडते. दोघींमधील सामाईक गुण म्हणजे त्या दोघीही खूप लाघवी आहेत.

इंदूबाबत अक्षयाने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “अतिशा ताई खूप मायाळू आहे. ती नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असते. मला देखील ती खूप मार्गदर्शन करत असते. तिच्याकडे सगळ्या समस्यांवर उपाय असतात. कुठल्याही गोष्टीला ती कधीच नाही असं म्हणत नाही. आम्ही सेटवर आणि शूटिंग संपल्यावर खूप गप्पा मारत असतो. मला तिच्या रुपात एक खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे.”

खरं तर सासू-सूनेची खरी जोडी कशी असावी याचे दर्शन ते मालिकेद्वारे देतच असतात. पण ऑफस्क्रीन देखील त्यांनी एका चांगल्या मैत्रीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.