भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा अभिनेता म्हणजे आर माधवन. तो भारतातील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याला अनेक भाषांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जाते. त्याने पडद्यावर कोणतीही व्यक्तिरेखा साकारली तरी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहते. ‘रॉकेटरी द नंबी इफेक्ट’ या चित्रपटासाठी नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकून चर्चेत आलेला आर माधवन आता एक नवीन जबाबदारी निभावताना दिसणार आहे.
आर माधवन (R. Madhavan ) याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर. माधवनच्या आधी दिग्दर्शक शेखर कपूर एफटीआयआयचे अध्यक्ष होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आणि अभिनेत्याचे अभिनंदनही केले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून शेखर कपूर यांचा कार्यकाळ 3 मार्च 2023 रोजी संपला. आता ही जबाबदारी अभिनेता-दिग्दर्शक आर. माधवनला मिळाली आहे. आर माधवनचे अभिनंदन करत अनुराग ठाकूर यांनी एक ट्विट केले आहे.
अनुराग ठाकूर यांनी ट्विट करताना लिहिले की, “एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नामांकन मिळाल्यावर आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बनल्यानंतर आर. माधवन यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की तुमचा अफाट अनुभव आणि मजबूत नैतिकता ही संस्था आणखी समृद्ध करेल. ”
तर त्यांच्या या ट्विटवर आर माधवनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “या सन्मानासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.” दरम्यान, आठवडाभरापूर्वी आर. माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट आर. माधवनने केवळ दिग्दर्शनच केले नाही तर अभिनयही केला आहे. (Famous actor R. Madhavan has been elected as the President of the National Film and Television Institute)
अधिक वाचा-
–खऱ्या मैत्रीचं नातं उलगडणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचे पोस्टर समोर
–साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!