Saturday, April 19, 2025
Home मराठी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकतीचा विवाह साेहळा थाटामाटात पडला पार, नवीन जाेडप्याचे फाेटाे एकदा पाहाच

प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकतीचा विवाह साेहळा थाटामाटात पडला पार, नवीन जाेडप्याचे फाेटाे एकदा पाहाच

मराठी संगीत विश्वात ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार ‘प्रशांत नाकती’ने दर्जेदार मराठी गाणी बनवत मराठी गाण्यांना भारतातच नव्हे, तर परदेशात पोहोचवलं. त्यांची सर्वच गाणी प्रदर्शित होताच काही सेकंदात सोशल मीडियावर ट्रेंडींग होतात. अशात नुकतंच ‘प्रशांत नाकती‘ आणि ‘प्रिया गोसावी’ यांचा सुंदर विवाहसोहळा मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जवळपास  200हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती.

या विवाहसोहळ्यासाठी विनायक माळी, गायक हर्षवर्धन वावरे, गायक रवींद्र खोमणे, गायक केवल वाळंज, गायिका सोनाली सोनावणे, संगीतकार कुणाल करण, विशाल फाले, नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार अश्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती‌.

विशेष म्हणजे प्रशांत नाकतीने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात. आता लग्नानंतर प्रशांतचं नवीन गाणं कोणतं असेल यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांतच्या लग्नाचं एक सुंदर ओरिजनल गाणं देखिल लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर, या नव्या गाण्याची चर्चा होत आहे.(Famous music composer Prashant Nakati’s wedding ceremony)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीने पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; अभिनेत्रीचा थक्क करणारा व्हिडिओ एकदा पाहाच
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’

हे देखील वाचा