Sunday, December 8, 2024
Home मराठी ‘काय मौसम- काय झाडी, तरी पण तुमचा भाऊ सिंगल’, प्रशांत नाकतीच्या नवीन गाण्याला तुफान प्रतिसाद

‘काय मौसम- काय झाडी, तरी पण तुमचा भाऊ सिंगल’, प्रशांत नाकतीच्या नवीन गाण्याला तुफान प्रतिसाद

कोणी एके काळी अशी वेळ होती, जेव्हा बघू तिकडे कपल्स असायचे. मात्र, आता असं वाटू लागलंय की सिंगल्सचा जमाना आला आहे. ‘सिंगल आहे आणि मिंगल व्हायची नितांत गरज आहे’, अशा कित्येकांच्या भावना नक्कीच असतील आणि हे अचूक कळलंय ‘मिलिनिअर प्रशांत नाकती’ याला.

नुकतंच निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक भन्नाट गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले आहे ज्याचे नाव ‘मी सिंगल’ असे आहे. गाण्याच्या शीर्षकावरूनच गाण्याचा विषय अनेकांना कळला आहे आणि तो विषय फारच खोल आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काय मौसम काय झाडी काय डोंगर, तरी पण तुमचा भाऊ हाय सिंगल’, या ओळीने ‘मी सिंगल’ गाण्याची सुरुवात होते. सुरुवातच इतकी भारी केली आहे की, संपूर्ण गाणं पाहताना एक वेगळीच मजा येते. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या म्युझिकल जोडीने हे गाणे गायले असून या गाण्यात गौरी पवार म्हणजेच बिनधास्त मुलगी, निक शिंदे आणि रितेश कांबळे यांनी टीनएजर्सची भूमिका साकारली आहे, जे सिंगल आहेत आणि त्यांना प्रेमळ जोडीदाराची सोबत हवी आहे.

रोहित जाधव दिग्दर्शित या गाण्याचे शब्द प्रशांत याने लिहिले असून संगीतही त्यानेच दिले आहे. या गाण्याचे शूटिंग नाशिकमध्ये करण्यात आले असून गाणे सुंदर पावसाच्या दिवसांत, हिरवळ, नैसर्गिक सौंदर्यात शूट झाले आहे. बिनधास्त मुलगी उर्फ गौरी पवार हिचा हा पहिलाच म्युझिक अल्बम आहे. म्युझिक अरेंजर संकेत गुरव यांनी केले असून, सर्व कलाकारांनी एमकेकांना सहकार्य करून अतिशय हलक्या-फुलक्या, आनंदी वातावरणार गाण्याचं शूट पूर्ण केलं.

प्रशांत नाकती याची प्रत्येक गाणी ही सुपरहिट होतातच. ‘मी सिंगल’ गाण्याच्या टिझरला, पण १ लाख पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आता हे संपूर्ण गाणं देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या गाण्याच्या शेवटी प्रशांत नाकती यांनी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे आणि ती बातमी म्हणजे TO BE CONTINUE म्हणजेच ‘मी सिंगल’चा दुसरा भाग पण येण्याच्या मार्गावर आहे. या गाण्याची विशेष खासियत अशी आहे की, पडद्यावर दिसणारे आणि पडद्यामागील कलाकार हे सिंगलच आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
इकडं आख्खा देश साजरा करत होता रक्षाबंधन, तिकडं ऋतिकची एक्स पत्नी बॉयफ्रेंडसोबत करत राहिली पार्टी
‘भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे’, ट्रोलिंंगनंतर गायक राहुल देशपांडेंनी टिकाकारांना दिले चोख उत्तर
अजय आणि युग या बाप-लेकामधील झक्कास नातं व्हिडिओतून आलं समोर, चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा