Tuesday, October 15, 2024
Home बॉलीवूड प्रसिद्ध निर्मात्याने रणवीरच्या मागे सोडला कुत्रा, खासगी पार्टीत अभिनेत्यासोबत केले ‘असे’ घाणेरडे कृत्य

प्रसिद्ध निर्मात्याने रणवीरच्या मागे सोडला कुत्रा, खासगी पार्टीत अभिनेत्यासोबत केले ‘असे’ घाणेरडे कृत्य

बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंग याने त्याच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याने बाॅलिवूडला ‘पद्मावत‘, ‘बॅंड बाजा बाराता’, ‘सर्कस‘, ‘दिल धडकने दाे’, ‘लुटेरा‘ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. मात्र, रणवीरला सुरुवातीच्या काळात अनेक संघर्षालासामाेर जावे लागले. अलीकडेच रणवीरने करिअरचा सुरुवातीचा काळ आठवत एक धक्कादायक खुलासा केला. 

रणवीर सिंग (ranveer singh) याने नुकतेच मोरोक्को येथील मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. चित्रपट महोत्सवात इटोइल डी’ओर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिनेता तिथे आला होता. त्याच्या हजेरीदरम्यान, रणवीरने कन्वर्सेशन इवेंटमध्ये देखील हजेरी लावली, जिथे त्याने त्याच्या बॉलीवूड प्रवास आणि हॉलीवूडच्या आकांक्षांबद्दल सांगितले.

माध्यमातील वृत्तानुसार, रणवीरने एका मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, “प्रख्यात निर्माता, जो आता या जगात नाही, त्याने त्याच्या मनोरंजनासाठी एका खाजगी पार्टीत माझ्या मागे आपला कुत्रा सोडला हाेता.” मात्र,अभिनेत्याने निर्मात्याचे नाव सांगण्यास नकार दिला.

या सेशनमध्ये रणवीर सिंगने त्या काळातील कास्टिंग काउचचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला की, “माणूस मला एका ठिकाणी बोलावतो आणि विचारतो, ‘तू मेहनती आहेस की हुशार?’. मी स्वतःला एक हुशार व्यक्ती समजत नव्हतो, म्हणूनच मी म्हणालो की, मी एक मेहनती व्यक्ती आहे. तर तो मला म्हणाला की, ‘डार्लिंग, स्मार्ट बन, सेक्सी बन.’ मला त्या साडेतीन वर्षांमध्ये  सर्व प्रकारचे अनुभव आले आणि मला वाटते की, हीच ती वेळ होती ज्याने मला प्रत्येक संधीच साेण करायला शिकवले.”

रणवीरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि फारशी कमाई करु शकला नाही. त्याचबरोबर आता तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात आणि करण जोहरच्या ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ यात दिसणार आहे. (famous producer unleashed his dog on actor ranveer singh for fun actor revealed about casting)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जया बच्चन अन् महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट चर्चेत, राजकारणातील मोठ्या मंत्र्याविरुद्ध केली तक्रार

भारीच ना! दीपिका – रणवीरच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण, ‘अशी’ हाेती पहिली भेट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा