Monday, March 4, 2024

जया बच्चन अन् महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट चर्चेत, राजकारणातील मोठ्या मंत्र्याविरुद्ध केली तक्रार

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या इतर नेत्यांसह महिला नेत्या देखील होत्या. जया यांच्यासह अन्य नेत्यांनी महाराष्ट्र सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली. अब्दुलने महिलांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप केला आहे.

जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी माध्यमांशी बालेताना सांगितले की, “आज आम्ही राज्यपालांना भेटलो आणि लवकरच राष्ट्रपतींनाही भेटू. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. राजकारण्यांसह कोणीही, जो महिलांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करतो, त्याला बाहेर फेकले पाहिजे.”

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कमेंटवर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minitster Abdul Sattar) यांनी वाद निर्माण केला. सुप्रिया म्हणाल्या होत्या की, “सत्तार यांनी स्वत: काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विरोधी पक्षही किऑस्कचा फायदा घेऊ शकतात. कराण, बंडखोर आमदारांवर असे केल्याचा आरोप होता.” त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया यांच्याविरोधात निंदनीय शब्दात टीका केली.

यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रदर्शन झाली. सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर, पुणे, जळगाव, नाशिक, अमरावती, जालना, लातूर, रत्नागिरी, बारामती आणि नंदुरबार येथे प्रदर्शन केली. नाशिकमध्ये अब्दुलच्या पुतळ्याला जोडे फेकण्यात आले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना नेत्यांनी सिल्लोड येथील सभेत बोलताना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावत, “दोन्ही पक्षांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. अब्दुल सत्तार जे म्हणाले ते चुकीचे होते आणि त्याचा बचाव करता येणार नाही. अशा भाषेच्या वापराला आमचा नेहमीच विरोध राहील. (bollywood actress jaya bachchan meet maharashtra governor for complaint agaisnt abdul sattar remark over supriya sule)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जेव्हा मला सलमानचा भाऊ आणि मलायकाचा पती नावने ओळखले…;’ म्हणत, अरबाजने व्यक्त केले दु:ख

दंगल गर्ल फातिमा सना शेख करतीये ‘या’ गंभीर आजाराचा सामना; फोटो शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा