Thursday, June 1, 2023

दुःखद | प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ यांचे निधन, इंडस्ट्रीत पसरली शोककळा

प्रसिद्ध पार्श्वगायिका संगीता साजिथ (sangeeta sajith) यांचे निधन झाले आहे. रविवारी २२ मे रोजी तिरुवनंतपुरममध्ये संगीताचा मृत्यू झाला. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रिपोर्ट्सनुसार, संगीता साजिथ किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. संगीता साजिथ यांनी मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

संगीता साजिथने साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये २०० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये गाणी गायली आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, संगीता साजिथ यांनी रविवारी तिरुअनंतपुरममधील तिच्या बहिणीच्या घरी अखेरचा श्वास घेतला. असे वृत्त आहे की, त्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. संजीता त्यांच्या बहिणीच्या घरी राहून किडनीशी संबंधित आजारावर उपचार घेत होत्या.

यादरम्यान रविवारी सकाळी संगीता साजीत जीवनाची ही लढाई हरली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. संजिताच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी गायकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही सिंगरच्या स्मरणार्थ शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा