Sunday, April 14, 2024

प्रेक्षकांचा ‘हा’ लाडका कलाकार बिग बॉसमध्ये करणार एंट्री; एका जोकमुळे थेट खावी लागलेली जेलची हवा

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांना देशभरातील लोक पसंत करतात. सोशल मीडियावर त्याचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. कंगनाच्या शोमध्ये आल्यानंतर त्याच्या करिअरला चालना मिळाली, त्यानंतर तो आता सलमान खानच्या शोमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मुनव्वरने बिग बॉस 17 मध्ये एन्ट्री घेतली आहे. अशा परिस्थितीत मुनव्वर यांच्या वादाचा आणि संघर्षाचा आढावा घेणार आहोत.

कलर्स वाहिनीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17‘ च्या प्रीमियरपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहेत. मुनव्वर फारुकी (Munawwar Farooqui ) यांचा फोटो सलमान खानसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत मुनव्वरचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही, मात्र बाजूच्या झलकवरून सलमान मुनव्वरशी बोलत असल्याचे स्पष्ट होते.

मुनव्वर फारुकी यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. व्यवसायाने स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या मुनव्वरने ‘लॉक अप’मध्ये आपल्या शब्दांनी चाहत्यांची मने जिंकली होती. तो या शोचा विजेता होता, त्यानंतर त्याला आणखी अनेक शोच्या ऑफर मिळू लागल्या. आज मुनव्वर म्युझिक व्हिडीओजसाठी गातो आणि त्यात सुद्धा दिसतो.

मुनव्वर यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी भगवान राम आणि माता सीता यांच्या नावावर अशोभनीय टिप्पणी केली. एवढेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचीही खिल्ली उडवली. मुनव्वर यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फारुकीची सुटका केली. मुनव्वर फारुकी यांची बिग बॉस 17 मध्ये एंट्री झाल्यामुळे शोची उत्सुकता आणखी वाढली आहे. मुनव्वर फारुकी हे एक करिष्माई व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांची एंट्री शोला एक वेगळी रंगत देईल. ‘लॉक अप’ सीझनमध्ये त्याने त्याच्या लग्नाचा खुलासा केला होता. मात्र, तो आता पत्नीसोबत राहत नाही. मुनव्वर अभिनेत्री नाझिलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचेही उघड केले होते. या शोमधून मुनव्वरच्या करिअरला सुरुवात झाली.

मुनव्वर यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. त्याची आई आणि आजी समोसे बनवायची, ती विकायची. यादरम्यान त्यांची बोटे अनेक वेळा भाजली. आईची बोटेही भाजली, पण ती काळासोबत जगायला शिकली होती. बहिणीच्या लग्नासाठी त्याची आई जबाबदार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यांच्यावर 3,500 रुपये कर्ज होते. अनेक कारणांमुळे त्याच्या आईने आपले जीवन संपवले. (Famous standup comedian Munawar Farooqui will make an entry in Salman Khan Bigg Boss 17)

आधिक वाचा-
सोनालीच्या प्रेमात आकंठ बुडालेला ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू; केलेला किडनॅप करण्याचा प्लॅन
‘फुकरे 3’ चित्रपटाचा जलवा कायम ; कमाईचा आकडा ऐकून उंचावतील भुवया, एकदा वाचाच

हे देखील वाचा