Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड शाहिदला चाहत्याने विचारले ‘पत्नी आणि मुलांपैकी कोणाला सांभाळणे अवघड’ शाहिदने दिले मजेशीर उत्तर

शाहिदला चाहत्याने विचारले ‘पत्नी आणि मुलांपैकी कोणाला सांभाळणे अवघड’ शाहिदने दिले मजेशीर उत्तर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचे सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोइंग आहे. शाहिद कपूर त्याच्या मस्त स्वभावासाठीही ओळखला जातो. तो असा अभिनेता आहे जो कधीच वादात अडकत नाही आणि लाइमलाइटपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करतो. शाहिद कपूर नेहमीच त्याच्या कामाच्या बाबतीत समर्पित असतो. कामासोबतच तो त्याच्या कुटुंबाला देखील वेळ देताना दिसतो. शाहिद अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असतो. अलीकडेच, शाहिद कपूरने ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनमध्ये चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

शाहिदचे विनोदी संवाद तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिलेच असतील. पण खऱ्या आयुष्यातही त्याने आपल्या मजेशीर स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच, त्याच्या चाहत्याने शाहिदला प्रश्न विचारला की, ज्याला शाहिदने दिलेले उत्तर पाहून चाहत्यांचे हसू थांबू शकले नाही. शाहिदला एकाने विचारले की, “घरात पत्नीची काळजी घेणे कठीण आहे की मुलांची काळजी घेणे अधिक कठीण आहे?” यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला की, “असे वाटते की तुम्ही अजून लग्न केलेले नाही.”

चाहत्याने त्याला विचारले की, “तुला ‘फॅमिली मॅन २’मधील सामंथाचा अभिनय कसा वाटला होता?” त्यावर शाहिद म्हणाला की, “खूप चांगला होता. मला नक्कीच तिच्यासोबत कधीतरी काम करायला आवडेल.” एका चाहत्याने विचारले की, “तुला ‘सूर्यवंशी’ चित्रपट पाहायला आवडेल का? यावर उत्तर देताना शाहिद कपूर म्हणाला की, “का नाही. मी चित्रपटगृहे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.” एकाने शाहिदला त्याच्या ‘जब वी मेट’ आणि ‘कबीर सिंग’ या चित्रपटांपैकी एक निवडण्यास सांगितले होते. त्यावर त्याने संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित कबीर सिंग सिनेमाची निवड केली. कबीर सिंगच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले.

शाहिद आणि मीरा पहिल्यांदा एका सत्संगात भेटले. शाहिद त्याचे वडील असणाऱ्या पंकज कपूर यांच्यासोबत दिल्लीत एका सत्संगात जायचा. या सत्संगात मीराचे कुटुंबही यायचे तिथेच त्या दोघांची भेट झाली. दोघांची मैत्री झाल्यानंतर पंकज कपूरने मीराच्या वडिलांसमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मीरा शाहिदपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे आणि त्यांचे लग्न झाले तेव्हा ती २१ वर्षांची होती. असे असूनही दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग दिसते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शाहिद कपूरकडे सध्या स्पोर्ट्स ड्रामा ‘जर्सी’ सिनेमा आहे. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असून, ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘जर्सी’ चित्रपट तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा