Wednesday, June 26, 2024

चाहत्यांचा कहर! चक्क ‘बेशरम रंग’ गाण्याचं गझल व्हर्जन, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हिंदु संघटना आणि भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याशिवाय सोशल मीडियार पठाण बॉकॉट मोहिमही सुरु झाला होती. मात्र, बेशरम रंग या गाण्याच्या ट्रोलर्सपेक्षा जास्त चाहत्यांचे प्रेम दिसून येत आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी या गाण्यावर ठेका धरला आहे. तर आता एका चाहत्याने या गाण्याचं गजल वर्जन देखिल काढलं आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

पठाण (Pathan) चित्रपटामधील बेशरम रंग (Besharm Rang) हे गाणं ट्रोलर्सपेक्षा जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्याशिवाय अनेक अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान करुन गाण्यावर ठेका धरला आहे. अशातच एका चाहत्यांना या गाण्याचं गझल व्हर्जन गायलं आहे , ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोलकत्तामध्ये राहणाऱ्या सौम्या मुखर्जी (Soumya Mukherjee) याने हे गझल व्हर्जन तयार केलं असून स्वत: गायलं आहे. हे गाणं पठाण चित्रपटाचा भाग नाही. फक्त आपली क्लपकथा म्हणून त्याने हे गाणं गायलं आहे.

त्याने तयार केलेल्या व्हर्जनमध्ये या गाण्याला शांत संगीत आणि पारंपारिक वाद्यांचा उपयोग केला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “एक दिवस मी आणि माझा भाऊ बेशरम रंग’ हे गाणं ऐकत होतो तेव्हा आमच्या मनात या गाण्याचं गझल व्हर्जन करण्याचा विचार आला,” असं त्याने हे नवीन व्हर्जन शेअर करताना लिहीलं. या गाण्याला युट्यूबवर लाखो लाईक्स मिळाले आहे. तर अनेकांनी “ओरिजिनल गाण्यापेक्षा हे व्हर्जन चांगलं आहे.”

 

View this post on Instagram

 

पठाण चित्रपटातील सर्वाधिक गाजलेलं आणि वादात अडकलेलं बेशरम रंग हे गाणं शाहरुख खान (Shaharukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्यावर चित्रित केलं आहे. या गाण्याला विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका शिल्पा राव (Shilpa Rao) हिने ते गायलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक सपनाने फ्लॉन्ट केला तिचा नवीन टॅटू, व्हिडिओ झाला व्हायरल
सिध्दार्थ मल्होत्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कियारा अडवाणीचा ब्रायडल लूक व्हायरल

हे देखील वाचा