Friday, March 29, 2024

स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक सपनाने फ्लॉन्ट केला तिचा नवीन टॅटू, व्हिडिओ झाला व्हायरल

हरियाणाचे डान्सिंग दिवा म्हणून सपना चौधरींचे नाव घेतले जाते. सपनाने तिच्या डान्सने आणि तिच्या गाण्यांनी फक्त दिल्ली हरियाणाचे नाही तर संपूर्ण देशाला वेड लावले. आपल्या मेहनतीने डान्समध्ये तिने स्वतःला स्थावर करत नावलौकिक मिळवला. आज सपना चौधरी हे नाव ओळखीचे नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सपना चौधरी नाव आले की ‘डान्स’ हा शब्द देखील ओघाने सोबतच येतो. इतके हे दोन शब्द एकत्र झाले आहेत. सपनाच्या लाइव्ह डान्स शोमध्ये अमाप गर्दी असते. तिची एक झलक पाहण्यासाठी खूप दुरून दुरून लोकं येतात.

सपना सोशल मीडियावर देखील तुफान लोकप्रिय आणि सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे विविध व्हिडिओ पोस्ट करत फॅन्सच्या संपर्कात असते. सपनाने नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती जबरदस्त डान्स करत असून तिच्या अदा आणि एक्सप्रेशन सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. मात्र यासर्वांमधे चर्चेचा विषय ठरला तो सपनाच्या पाठीवर असणारा तिचा टॅटू. व्हिडिओमध्ये सपनाने नारंगी रंगाचा पंजाबी सलवार सूट घातला असून केस मोकळे सोडले आहे. डान्स करताना ती वळते आणि पाठीवरचे केस बाजूला सारते. तेव्हाच तिचा टॅटू सर्वांना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

या व्हिडिओमध्ये सपना एका शोमध्ये लाइव्ह परफॉर्म करत आहे. तिचा डान्स सर्वांनाच आवडत असून, ती डान्स करत असताना प्रेक्षक तिला अजून प्रोत्साहन देखील देत होते. सपनाने तिचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिच्या फॅन्सला एक आवाहन केले आहे. ती लिहिते, “जर तुम्हाला हे गाणे आवडले तर तुमच्या खास माणसासाठी यावर एक रील बनवा आणि आम्हाला टॅग करा.” सपनाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत नवनवीन भन्नाट रील बनवले आहे.

हरियाणाची डान्सिंग क्वीन म्हणून सपना चौधरी ओळखली जाते. आधी हरियाणा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेल्या सपनाला बिग बॉस या शोने जागतिक ओळख मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा