Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड ‘पठाण’ चित्रपटाचा संपला वनवास! ट्रेलरमध्ये शाहरुखने थ्रिलर,अ‍ॅक्शनचा लावलाय तडका

‘पठाण’ चित्रपटाचा संपला वनवास! ट्रेलरमध्ये शाहरुखने थ्रिलर,अ‍ॅक्शनचा लावलाय तडका

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटामधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून पठाण वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. त्यमुळे चित्रपटामध्ये काही बदल करण्याची मागणी अनेकांनी केली असून चित्रपटाला सेन्सॉर बोर्डला पाठवण्यात आलं आहे. अशातच (दि, 10 जानेवारी) रोजी पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कही दिवसांपूर्वीच चित्रपटचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता मात्र, पठाणच्या ट्रेलने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. त्याशिवाय शाहरुख जोरदार अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे.

लाखो चाहत्यांवर भुरळ घालाणारा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shaharukh Khan) पुन्हा एकाद प्रेक्षकांसाठी थ्रिलर, अ‍ॅक्शन पाहायाला मिळणार. अनेक दिवसांपासून त्याचा आगामी येणारा चित्रपट पठाणमुळे शाहरुखने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पठाण (Pathan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharm Rang) गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे चित्रपटवर बॉयकट मोहिम सुरु केली होती. गाण्याच्या ट्रोलर्सपेक्षाजास्त प्रेक्षकांचं बेशरम गाण्याचं प्रेम दिसून आलं. नुकतंच पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये शाहरुखचा लूक आणि थ्रिलर अ‍ॅक्शन पाहून चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुखच नाही तर दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम याच्या शिवाय डिंपल कपाड़िया (Dimple Kapadia) देखिल पाहायाल मिळत आहे. यांच्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाविषयी क्रेज वाढत आहे. ट्रेलर पाहूण चाहते उत्सुकतेने पठाण चित्रपटाची वाट पाहात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कधीकाळी मुंबईच्या गल्ल्यांमध्ये कपडे विकणारा फैझल शेख आज आहे कोट्यवधी परफ्युम ब्रँडचा मालक
‘पठाण’ चित्रपटाच्या वादात अर्जुन कपूरची उडी, म्हणाला, ‘सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारवर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा