Sunday, June 23, 2024

फॅनला बॉडीगार्डने धक्का दिल्यानंतर ‘अशी’ होती अक्षय कुमारची प्रतिक्रिया

कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांचे अनेक किस्से मीडियामध्ये बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. कलाकारांना देखील नेहमीच त्यांच्या फॅन्सच्या प्रेमाचा विविध पद्धतीने प्रत्यय येत असतो. अनेकदा कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कलाकारांबद्दल फॅन्सच्या मनात असलेल्या प्रेमाचा कधी कधी त्यांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतो. मात्र कधी कधी कलाकार देखील फॅन्सच्या मनातील भावना समजून घेत त्यांना स्वतःहून भेटतात. असच काहीसा प्रत्यय आला आहे, अभिनेता अक्षय कुमारच्या एका फॅनला.

सध्या अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे त्यांच्या आगामी ‘सेल्फी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाचे जोरदार प्रमोशन चालू असल्यामुळे ते विविध ठिकाणी भेट देऊन लोकांना या सिनेमाबद्दल जागरूक करत आहेत. नुकतेच हे दोघं पुण्यात पोहचले होते. तिथे त्यांना बघण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती. दोघांची झलक मिळावी आणि त्यांना आपल्या फोनमध्ये कैद करता यावे यासाठी सर्वच लोकं धडपड करत होते. मात्र इथे असे काही घडले की, ते पाहून सर्वांनाच आनंद वाटला.

सोशल मीडियावर सध्या अक्षय आणि इमरान यांच्या या प्रमोशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी त्यांच्या फॅन्ससोबत मस्ती, डान्स करताना दिसत असून, सर्वच लोकं त्यांना पाहून खुश आहेत. यातच अक्षय कुमारचा एक फॅन त्याच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांना बॅरिकेडिंग असल्यामुळे ते शक्य होत नाही. नंतर तो त्या बॅरिकेडिंगवरून उडी मारतो आणि अक्षय कुमारजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र इथे त्यांना अक्षयचे बॉडीगार्ड थांबवतात आणि मागे फिरायला सांगतात. मात्र हे अक्षय बघतो आणि त्या गार्डमधून घुसून फॅनजवळ जात त्याला मिठी मारतो.

अक्षयचे हे वागणे पाहून सर्वच त्याचे जोरदार कौतुक करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून, नेटकाऱ्यानी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तत्पूर्वी अक्षय आणि इमरान यांचा सेल्फी हा सिनेमा येत्या २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून, यात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसोबत नुसरत भरुचा आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचा ट्रेलर चांगलाच गाजत असल्यामुळे सिनेमा हिट होणार असे सांगितले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

 

 

हे देखील वाचा