‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा


राजेश्वरी खरात तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात शालू जितकी गाजली तितकीच ती सोशल मीडिया प्रसिद्ध असल्याचे दिसते. शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. व्हिडिओ सोबतच तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुन्हा राजेश्वरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात चाहत्यांना पुन्हा तिच्या सुंदरतेचं दर्शन झालं आहे. तुम्ही पाहू शकता की, यात राजेश्वरीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती “मेरे ढोलना’ या गाण्यावर अभिनय करताना दिसली आहे. काळ्या साडीमध्ये शालूच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ओ पिया.” व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल व्हायला लागला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत २६ हजाराहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला आहे. (fandry fame rajeshwari kharat shared video in black saree see here)

राजेश्वरी सतत तिचे असे ग्लॅमरस फोटो शेअर करून, चाहत्यांना घायाळ करत असते. या साडीवर देखील तिने तिचा भुरळ पाडणारा फोटो शेअर केला आहे. फोटोलाही चाहत्यांनी खूप प्रेम दिले आहे. आतापर्यंत तिच्या या साडीतील फोटोला १५ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

-‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच

-‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.