‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


अभिनेत्री प्रिया बापट ही एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तिने सिनेसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. आजपर्यंत तिने तिच्या अभिनयाचा आलेख कायम उंचच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते.

नुकताच प्रियाने एक फोटो शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. विशेष म्हणजे यात प्रिया ज्याप्रकारे हसत आहे, हे पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करून प्रियाने कॅप्शनमध्ये, “क्रेझी किया रे” असं लिहिलं आहे. फोटोला आतापर्यंत ३६ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे.

प्रियाचे साडीवरचे प्रेम सर्वांना ठाऊक आहे. सतत ती तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते, ज्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेमही मिळते. अलीकडेच तिने पुन्हा एकदा साडीतील फोटो शेअर करून, चाहत्यांना घायाळ केलं. यात साडीमध्येही तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे. हलक्या गुलाबी रंगाची साडी प्रियाने अगदी उत्तमरीत्या कॅरी केलेली पाहायला मिळाली.  (priya bapat shared a photo and said crazy kiya re)

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीने घातला विचित्र ड्रेस; नेटकरी म्हणाले, ‘आज समजले आपल्या देशात…’

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.