Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘आतुरतेने वाट पाहात आहोत’, म्हणत फॅन्सने केले ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटाच्या पोस्टरचे कौतुक

‘आतुरतेने वाट पाहात आहोत’, म्हणत फॅन्सने केले ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटाच्या पोस्टरचे कौतुक

अभिनेता सलमान खानचा त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमान खान प्रॉडक्शन हाऊसच्या या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचे या पोस्टरमध्ये दिसून येते. ‘अंतिम’च्या या पोस्टरबद्दल चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांना सलमान खान आणि आयुष शर्मा यांची दमदार ऍक्शन चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचे हे पोस्टर सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरबद्दल चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने ‘राधे’ आणि ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या पोस्टर्सपेक्षा हे पोस्टर चांगले असल्याचे सांगितले आहे. एका चाहत्याने सलमान खानच्या लूकबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो युजर म्हणाला की, ‘बऱ्याच काळापासून आम्हाला तुमचा हा लूक पाहायचा होता. आम्ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत. लव्ह यू भाई मस्त पोस्टर आहे.’

‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाची कथा वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या एका पोलीस आणि गुंडाभोवती फिरते. चित्रपटाची कथा खूप जबरदस्त सांगितली जात आहे. सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा हे एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्स प्रस्तुतचा असून या चित्रपटाचे निर्माते सलमान खान आणि महेश मांजरेकर आहेत. तर चाहते आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या सिनेमाटी गणपती बाप्पाचे गाणे देखील प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा