बॉलिवूडची देखणी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अभिनय असो किंवा डान्स प्रत्येक गोष्टीत ती आघाडीवर असते. ती नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असते. अशामध्ये तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यामध्ये तिची जबरदस्त बॉडी दिसत आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत ती आपल्या फिटनेसवरही लक्ष देते. या व्हिडिओमध्ये एकप्रकारे तिने आपल्यातही दम असल्याचे दाखवले आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
इतर अभिनेत्रींप्रमाणे उर्वशीही आपल्या फिटनेसबाबत जागरूक आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमधून तिची फिनटेसप्रती असलेली जागरूकता दिसून येते. या व्हिडिओत ती वर्कआऊट करताना दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातलेली आहे. या व्हिडिओत उर्वशी बॉक्सिंग रिंगमध्ये ऍक्शन अंदाजात दिसत आहे. ती सातत्याने एका व्यक्तीच्या हातातील ग्लोव्ह्जवर किक मारत आपले लढाऊ कौशल्य दाखवत आहे.
एक दिवसापूर्वी तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले होते की, “आपल्या आगामी चित्रपटासाठी कसून तयारी करताना. आपले ऍक्शन स्टंट करणे खूप सुखदायी आहे. हे असे आहे, जे करणे मला खूप आवडते.”
यावरून स्पष्ट होते की, ती आपल्या कोणत्यातरी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तरीही तिने या पोस्टमध्ये आपल्या चित्रपटाचे नाव जाहीर केले नाही. चाहत्यांनाही तिचा हा आक्रमक खूपच आवडत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल २ लाख ५० हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त ३ हजारांपेक्षा अधिक युजर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उर्वशी रौतेलाच्या करिअरची सुरुवात ऍक्शन रोमान्सवर आधारित ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटात ती सनी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच जियो स्टुडिओच्या आगामी ‘इस्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. यासह उर्वशी रौतेला लवकरच तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल