Saturday, June 29, 2024

‘बालिका वधू’ फेम अविकाचा दिसला बिकिनी अवतार, फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

टीव्ही मालिकेच्या माध्यमातून अनेक नवनवीन चेहरे समोर आतापर्यंत समोर आले आहेत, किंबहुना अजूनही येतच आहेत. अगदी कमी कालावधीत हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. हे कलाकार पडद्यावर साकारलेल्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्ध होतात. इतकेच नव्हे तर त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांना अभिनय क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळते.

जर एखाद्या मालिकेत मुख्य अभिनेत्रीने संस्कारी सुनेची भूमिका पार पाडली असेल तर ती त्याच भूमिकेने ओळखली जाते. जर चाहत्यांनी त्या अभिनेत्रीला ऑफ कॅमेरा वेगळ्या अवतारात पाहिले तर प्रेक्षकांना धक्काच बसतो. स्क्रीनवर सध्या, सोज्ज्वळ दिसणाऱ्या या अभिनेत्री प्रत्यक्षात मात्र खूपच बोल्ड असतात. ‘बालिका वधू’ या मालिकेतील अभिनेत्री अविका गौरचे देखील असेच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

सध्या अविका मालदीवमध्ये असून, ती तिथे सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत आहे. सोबतच ती तेथील काही फोटो आणि व्हिडिओ देखील फॅन्ससोबत शेअर करत आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये ती समुद्राच्या किनाऱ्यावर बसून आराम करत आहे. अविका सुट्टी एन्जॉय करताना आणखीच ग्लॅमरस अवतारात समोर आली. तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये भाविकाने बिकिनी आणि मोनोकिनी घातलेली दिसत आहे. अविकाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये अविका तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे, तर दुसरीकडे ती समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूशी खेळत आहे. याशिवाय तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला असून व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, “येथे समुद्र किनाऱ्यावर वॉटर व्हिलातून फक्त सूर्योदय आणि सूर्यास्तच नाही तर दिवसाचा प्रत्येक क्षण हा खूप सुंदर आहे.”

अविकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘बालिका वधू’ मालिकेतून नावारूपास आलेल्या अविकाला या मालिकेने तुफान यश आणि लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने ‘छोटी आनंदी’ हे पात्र साकारले होते. ‘बाल विवाह’ या मुद्द्यावर आधारित या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. अविकाने तिचे पात्र खूप साध्या आणि सोज्वळ पद्धतीने साकारले. त्यामुळे तिला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. याच्या व्यतिरिक्त ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरच्या बहिणीच्या भूमिकेत देखील झळकली होती. अविकाने ‘लाडो-वीरपूर की महाराणी’, ‘फियर फॅक्टर’ यांसारख्या मालिकेतून काम केले. अविकाने काही चित्रपट आणि लघुपटांमध्ये देखील काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा