Wednesday, June 26, 2024

चप्पल घालून गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यामुळे ट्रोल झाली फराह; नेटकरी म्हणाले, ‘चप्पल काढा नाहीतर…’

संपूर्ण देशभरात मंगळवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे गणपती महोत्सव साजरा केला जात आहे. लोक एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत आहे. बॉलीवूडमध्येही, सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने देखील चाहत्यांना गणपती महोत्सवाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट केली होती. पण त्यावरून ती ट्रोल झाली होती.

झालं असं की, फराह खानने (Farah Khan) तिच्या इंस्टाग्रामवर हुमा कुरेशी आणि राजकुमार रावची पत्नी पत्रलेखासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फराह निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सूटसोबत मॅचिंग चप्पल घातलेली दिसत आहे. हुमाने पर्पल कलरचा सूट घातलेला दिसत आहे. तर पत्रलेखाने गोल्डन कलरची साडी नेसलेली आहे. फोटोत तिन्ही सुंदरी हात जोडून उभ्या दिसत आहेत.

फराह खानने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “खान, कुरेशी आणि राव यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छ. राजकुमार राव, तुम्ही इतके व्यस्त होता की तुमच्याशिवाय आम्ही हे सर्व केले.” या फोटोमध्ये फराह खानने चप्पल घातलेली पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. एका यूजरने लिहिले की, “कृपया गणपतीसमोर चप्पल काढा.’ आणखी एका व्यक्तीने लिहिले, “चप्पल घालून कोण पूजा करतं का फराह?”

फराह खाननेही ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. कमेंटला उत्तर देताना तिने लिहिले की, “आम्ही घराबाहेर होतो, खूप खूप धन्यवाद.” यावर एका चाहत्याने फराहला उत्तर दिले, “मला वाटतं की तुला उत्तर देण्याची गरज नाही, हे लोक खूप ओव्हरस्मार्ट आहेत.” राजकुमार रावची पत्नी पत्रलेखानेही तिच्या इंस्टाग्रामवर गणपतीच्या पूजेचे फोटो पोस्ट केले आहेत. हुमा आणि फराहसोबतचा फोटो पोस्ट करत पत्रलेखाने लिहिले की “तीन महिला.” सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. (Farah Khan got trolled for having darshan of Ganpati Bappa wearing chappals)

आधिक वाचा-
धक्कादायक! ‘इमली’ मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने ‘या’ व्यक्तीचा मृत्यू
‘आता सुपरस्टार्सचे युग संपले’, राज कपूर आणि देव आनंद यांची आठवण काढताना नाना लगावला टोला

हे देखील वाचा