Monday, April 15, 2024

…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला असाच एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्यमय वातावरण निर्माण झाले. जुही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरही बर्‍यापैकी सक्रिय असते. शोच्या मंचावर जुहीसोबत कोरियोग्राफर आणि चित्रपट निर्मिती फराह खानही दिसली. फराह यात ‘लाफिंग बुद्धा’ची भूमिका साकारताना दिसली. या दरम्यान, जुहीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

काही दिवसांपूर्वी  सेटवर फराहने जुहीच्या कानाखाली वाजवली होती. हा किस्सा सांगताना जुही (juhi chawla) म्हणाली की, “मी या आधीही काॅमेडी शो बघितले आहे. फराह यांनी अनेकदा स्पर्धकांच्या कानाखाली वाजवली होती. यापूर्वी जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायचे, तेव्हा दररोज मार खावा लागायचा.” जुही पुढे बोलताना म्हणाली की, “फराह कधी कधी सेटवर आल्यानंतर सर्वांचे निरीक्षण करत असायच्या. सेटवर सर्वजण खूप मेहनत करायचे. परंतु, फराहा ते जे करत आहेत ते आवडत नव्हते. एके दिवशी असा प्रसंग घडला की, त्या संपुर्ण टीमसमोर माईक घेऊन सर्वांना ओरडल्या.”

जुहीने सांगितले की त्यावेळी फराह म्हणाली, “ही बकवासगिरी का सुरू आहे? तुम्ही सर्वजण काय करत आहात? ” त्याचे हे बोलणे ऐकून जुही आणि सर्व टीमला खूप भिती वाटली होती. जुहीने सांगितलेला  हा किस्सा ऐकून शोच्या सेटवरील सर्वजणांना हसू अनावर झाले. त्याचवेळी, जुहीच्या या बोलण्याला फराहने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “ते दिवस खूप बकवास होते. परंतू, आपण एकत्र गाणी गायली आणि मला तेव्हा खूप मज्जा यायची. जुही तू माझ्या जवळच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेस.”

एवढेच नव्हे, तर शो दरम्यान जुहीने पती जय मेहतासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. शोमध्ये काॅमेडियन गौरव दुबेने जुहीचा प्रसिद्ध चित्रपट ‘हम है राही प्यार के’ मधील ‘मुंबई से गयी पूना…’ गाणे गायले. तसेच जुहीला विचारले की, तुम्ही आणि जय मेहता परत कसे भेटला? गौरवच्या  प्रश्नाचे उत्तर देताना जुही म्हणाली, “आम्ही चुकून भेटलो.” जुहीचे हे उत्तर ऐकून संपूर्ण मंचावर हशा पिकला.(juhi chawla recalls those days when farah khan slapped her fornot doing perfect dance steps)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

 

हे देखील वाचा