Monday, October 2, 2023

धक्कादायक! ‘इमली’ मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने ‘या’ व्यक्तीचा मृत्यू

एकीकडे संपूर्ण लोक मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष करत आहे, तर दुसरीकडे ‘इमली‘च्या सेटवरून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. दादासाहेब फाळके फिल्मसिटी, गोरेगाव, मुंबई येथे इमली मालिकेच्या सेटवर एक कामगार विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.

झाल असं की, स्टार्स प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘इमली‘च्या (Imli series) सेटवर आज एक कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गोरेगाव फिल्मसिटीत सुरू असलेल्या या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली. कामगार एका सेटवर विद्युत काम करत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत कामगार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महेंद्र असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो इमलीच्या सेटवर बराच काळ काम करत होता. सेटवर 19 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. त्याच सेटवर काही वेळापूर्वी 28 वर्षीय महेन्होडगीर यांचा विजेचा धक्का लागला होता. महेंद्रने त्याच्या मित्रांना सावध करून तेथे न जाण्याचा सल्ला दिला होता. हा अपघात झाला तेव्हा महेंद्र श्वास घेत होता. प्रॉडक्शन टीमने त्याला तात्काळ अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र वाटेतच महेंद्रचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर इमलीचे शूटिंग बराच काळ थांबले होते. मात्र, महेंद्र तेथे का गेला आणि त्याचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. केवळ इमलीच नाही तर अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांसह रिअॅलिटी शोचे चित्रीकरण फिल्मसिटीमध्येच झाले आहे. 520 एकरमध्ये पसरलेल्या या फिल्मसिटीमध्ये जवळपास 16 स्टुडिओ आणि 42 आऊटडोअर शूटिंग लोकेशन्स आहेत आणि इथे परवानगीशिवाय लोकांना प्रवेश दिला जात नाही. (Lightman died due to electric shock on the sets of the famous Imli series)

आधिक वाचा-
ट्रोलिंगवर अभिनेत्री रश्मी देसाईने ट्रोलिंगला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली- ‘माझ्या आई-वडिलांवर अत्याचार झाले…’
‘आता सुपरस्टार्सचे युग संपले’, राज कपूर आणि देव आनंद यांची आठवण काढताना नाना लगावला टोला

हे देखील वाचा