बॉलिवूड अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा आपला टॉक शो घेऊन आला आहे, ज्याचे नाव ‘पिंच २’ आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांना बोलावले जाते. तसेच, ट्रोलर्स त्यांच्याविषयी काय बोलतात, यावरही चर्चा केली जाते. यावेळी फराह खान शोमध्ये हजेरी लावणार आहे आणि ती या ठिकाणी ती बरीच धमाल करताना दिसणार आहे. नुकताच याचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
इतर कलाकारांप्रमाणे फराह खानला देखील प्रचंड ट्रोल केले जाते. या व्हिडिओच्या सुरुवातीला फराह खान म्हणते की, ‘ज्याच्या हातात फोन आहे, तो स्वतःला चित्रपट समीक्षक समजतो.’ यादरम्यान तिने ‘तीस मार खान’ या चित्रपटादरम्यान झालेल्या टीकेबद्दलही सांगितले.
‘पिंच २’ शो दरम्यान, फराह खानने अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचल्या. त्यात एक नेटकऱ्याने लिहिले की, ‘जाडीची मुलं इतकी बारीक कशी काय?’ या ट्रोलरच्या कमेंट्सला उत्तर देताना फराह खान म्हणते, “अरे, तू तुझ्या मुलांना सांभाळ, मी माझ्या मुलांना सांभाळेल.” शिवाय ‘पिंच २’ शोच्या मागील भागांमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. यावेळी कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान या शोची पाहुणी असेल आणि ती देखील अनेक खुलासे करेल.
या प्रोमोमध्ये फराह खानने कबूल केले आहे की, ती ‘तीस मार खान’साठी ट्रोल करणाऱ्यांना ब्लॉक करुन टाकते. फराह अशा ट्रोलर्सना सांगते की, “भाऊ, आता १० वर्षे झाली, आता पुढे जा.” ती ट्रोलर्सच्या रागात म्हणाली, “ज्यांच्याकडे फोन आहे, तो फक्त टीकाच करतो. मात्र आम्हाला चित्रपटाविषयी सर्व माहिती आहे.”
फराह म्हणाली, “ट्विटर अकाऊंटवर फक्त ‘हॅलो’ लिहिले तरी ट्रोलर्स म्हणतात, ‘नमस्ते नाही बोलू शकत का.” अनेकदा ट्रोलर्स फराहला निशाण्यावर धरतात. फराह सांगते की, ती ट्रोलर्सना कधीच गांभीर्याने घेत नाही. नेपोटिझमच्या मुद्द्यावर ती म्हणते की, “नेपोटिझमबद्दल बोलूनही तुम्हाला शाहरुखची मुलगी किंवा करीनाच्या मुलाचे फोटो पाहायला आवडतात.”
फराह खान एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक आहे. तिने १०० हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तिचा जन्म मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव मेनका आहे, त्या पटकथा लेखक हनी ईरानी यांच्या बहीण आहेत. फराहने तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूर्ण केले. तिने २००४ मध्ये शिरीष कुंदूरशी लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ