Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड फरहान अख्तरला आली होती ‘रंग दे बसंती’ चित्रपटाची ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार

फरहान अख्तरला आली होती ‘रंग दे बसंती’ चित्रपटाची ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने आतापर्यंत चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत 2 चित्रपटात काम केले आहे. ते म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’ आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘तूफान’ हा चित्रपट. पण तुम्हाला माहीत आहे का? राकेश यांनी फरहानला आणखी एका चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती नाकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश यांनी सांगितले की, त्यांचा सुपरहिट चित्रपट ‘रंग दे बसंती’ त्यांनी फरहान अख्तरलाही ऑफर केला होता. (Farhan Akhtar was offered a role of rang de Basanti movie, but he rejected that movie)

पीटीआयसोबत बोलताना राकेशने सांगितले की, “फरहान त्यावेळी खूप खुश होता. कारण त्याने ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पूर्ण केले होते आणि तो ‘लक्ष्य’ वर काम करत होता. मी त्याला म्हणालो होतो की, त्याने माझ्या चित्रपटात अभिनय करावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी त्याला विश्वास बसला नाही. कारण तो दिग्दर्शन करण्यात व्यस्त होता. मी त्याला ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात करणची भूमिका ऑफर केली होती. ती एकमेव अशी भूमिका होती जी लेखकाच्या कॅरक्टरवर आधारित होती. फरहान हे ऐकून खूप खुश झाला होता. मला त्याच्या डोळ्यामध्ये चमक दिसत होती. त्याने विचार केला की, या माणसाला मला चित्रपटात अभिनय करताना का बघायचे आहे?”

ओमप्रकाश यांनी पुढे सांगितले की, “फरहानला चित्रपटाची कहाणी आवडली होती. परंतु त्यावेळी त्याला अभिनय करायचा नव्हता. तो त्यावेळी दिग्दर्शनामध्ये व्यस्त होता.” फरहानने 2008 साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने राकेशसोबत ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम केले.

https://www.instagram.com/p/CQ0luq4LUtb/?utm_source=ig_web_copy_link

फरहान अख्तर पुन्हा एकदा ओम प्रकाशसोबत ‘तूफान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, मोहन अगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज या कलाकारांसोबत फरहान मुख्य भूमिकेत काम करणार आहे. या चित्रपटात एका गुंड्यापासून ते बॉक्सर होण्याचा प्रवास दाखवला आहे. फरहान अख्तर हा अजीज अली नावाच्या मुख्य भूमिकेत असणार आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा