गाणे गाण्याची आवड जवळपास सर्वांनाच असते. काहींमध्ये ही आवड लहानपणापासून असते, त्यामुळे ते आपली कारकीर्द गायक म्हणून घडवण्याच्या दिशेने पाऊले टाकत असतात. आज अनेक गायकांनी स्वत: वर मेहनत घेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक पंजाबी गायक म्हणजे ‘मनी सिंग’. मनीने आपल्या अनेक चांगल्या गाण्यांमुळे आणि संगीताच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्याचे नुकतेच एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या गाण्याच्या व्हिडिओला चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळत आहे.
मनी सिंगचे ‘फरमान’ हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे गाणे कठीण परिस्थितीत ध्यैर्य वाढवणारे असल्याचे म्हटले जात आहे.
कोरोनाच्या पुनरागमनासोबत गाणेही झाले व्हायरल
सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा होताना दिसत आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा वाढली आहेत. अशामध्ये ‘फरमान’ हे गाणेही पुन्हा व्हायरल होत आहे. मागील वर्षी सन २०२० मध्ये कोरोना काळात ‘फरमान’ हे गाणे रिलीझ केले होते.
या गाण्याचे बोल खूपच चांगले असून थेट हृदयात घर करणारे आहे. कोरोनाने आपल्याला ही जाणीव करून दिलीय की, प्रत्येक सजीवाचे महत्त्व खूप जास्त आहे. जर आपण निसर्गाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर निसर्गही आपल्याला प्रत्युत्तर देईल. या गाण्याचे बोल जितके चांगले आहेत, तितकेच हे गाणे गोड आवाजात गायलेही आहे.
लॉकडाऊनमध्ये झाले होते शूट
कोरोनाच्या दरम्यान ‘फरमान’ या गाण्याचे शूटिंग झाले होते. लॉकडाऊनदरम्यान या गाण्याची निर्मिती आणि शूटिंग करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी मनी सिंग आणि त्याच्या टीमने खूप मेहनत घेतली होती. आतापर्यंत या गाण्याला १ लाखापेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे.
मनी सिंगला जेव्हा पहिल्यांदा मिळाली होती गाण्याची संधी
मनी सिंग या इंडस्ट्रीमधील एक यशस्वी गायक आणि संगीतकार बनण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्याची प्रतिभा पाहून, त्याला टी-सीरिजने संधी दिली. त्यानंतर त्याने आपले ‘आंखो से’ हे पहिले गाणे टी- सीरिजने रिलीझ केले होते. या गाण्यालाही चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळाली होती.
यानंतर सन २०१५ मध्ये सागा हिट्सवर त्याचे ‘तांग लँग लँग’ हे गाणे रिलीझ करण्यात आले होते. हे गाणेही यशस्वी ठरले होते. यानंतर झी म्युझिक कंपनीने सन २०१७ मध्ये त्याचे ‘ओह सेलिना’ गाण्याने त्याला पंजाबी गायक म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’, शिल्पा शेट्टीचा मालदीवमध्ये दिसला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज
-‘दंगल’ चित्रपटातील ‘बबिता’ने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आजमावले होते डान्समध्ये आपले नशीब, आता आहे आघाडीची अभिनेत्री
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ