‘हर हर शंभू‘ गाणे सोशल मीडियावर चांगलेच हिट झाले आहे. हे गाणे गाणारी फरमानी नाजही लोकप्रिय झाली आहे. तिची फॅन फॉलोविंग वाढली असून चाहते आता तिच्यासाेबत सेल्फी घेण्यास इच्छुक असतात. फरमानी नाझ तिचा भाऊ भूरा ढोलकसोबत व्हिडिओ देखील बनवत असते. मात्र, नुकतेच हे दोघे भाऊ-बहीण बाजारात केवळ 40 रुपयांसाठी भांडताना दिसले. भांडणादरम्यान भूराने बहिण फरमानीला खूप काही ऐकविले.
फरमानी नाझ (Farmani Naaz) हिच्या आवाजाने लोकांना वेड लावले आहे, तर दुसरीकडे तिचा भाऊ भूरा ढोलक (Bhura Dholak) याची मजेशीर स्टाईलही लोकांना आवडते. नुकताच या दोघांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे भांडताना दिसत आहेत. मात्र, हे भांडण केवळ एक विनोदाचा भाग आहे. 19 सप्टेंबरला रिलीज झालेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओमध्ये भूरा बॅटरी रिक्षाचालक म्हणून दिसत आहे, तर फरमानी नाझ प्रवासी आहेत. फरमानीचे चाहते तिच्यासोबत फोटो काढू लागतात. या सर्व प्रकाराने भुरा अस्वस्थ हाेऊन जाताे ज्यावर फरमाणी त्याला जत्रेत फिरायला सांगते. यावर भूरा प्रथम तिच्याकडे पैसे मागतो आणि म्हणतो की, “मी यामुळे अस्वस्थ झालो आहे.” संपूर्ण जत्रेत भाऊ-बहीण प्रत्येक गोष्टीवरून भांडताना दिसतात. सध्या या दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून त्यांच्यावर लाईक्सचा वर्षाव हाेत आहे. दोघे बहीण- भाऊ युट्यूब व्हिडिओ बनवत असतात. ‘हर हर शंभू’ या गाण्यानंतर फरमानीचे नशीब पालटले आणि तिला खूप प्रसिद्धी मिळाली. फरमानी म्हणते की, तिला अधिक चांगली संधी मिळाल्यास ती अधिक चांगले गाऊ शकते.
फरमानीने ‘इंडियन आयडल’मध्ये देखील सहभाग घेतला हाेता. मात्र, मुलांची तब्येत खराब झाल्यानं तिला अर्ध्यातूनच शाे साेडावा लागला हाेता. फरमानी भजन आणि नज्म गाणं व्यतिरिक्त चित्रपटातील गाणं देखील गाते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कायदेशीर कारवाई करायचीये, पण…’, म्हणत गाणं रिमेक केल्याने नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक
बिहारच्या लोकांकडून सोनूचे जंगी स्वागत, अभिनेत्यानेही घेतला प्रसिद्ध पदार्थाचा आस्वाद; व्हिडिओ व्हायरल
चाहत्यांना बेधुंद करणारा अमलाचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी